कोणाचे नशीब कुठे फळफळेल हे सांगता येत नाही. केरळमधील एका व्यक्तीला असाच एक नशीब पालटवणारा अनुभव आला आहे. या इसमाने 500 रुपयाची नोट सुट्टी करण्यासाठी लॉटरीचे तिकीट काढले आणि अवघ्या काही तासात तो करोडपती झाला.
केरळ कोट्टायम येथील सदानंदन ओलीपराम्बिल असे या व्यक्तीचे नाव आहे. सदानंदन रविवारी सकाळी भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र भाजी घेण्यासाठी 500 रुपये सुट्टे हवे होते, त्यांनी जवळपासच्या दुकानात सुट्टे पैसे करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना कुठेच सुट्टे पैसे मिळाले नाहीत. अखेर जवळच असलेल्या लॉटरीच्या स्टॉलवरुन त्यांनी लॉटरीचे तिकीट फाडले आणि पैसे सुट्टे घेतले. सदानंद यांना लॉटरीचे तिकीट काढण्याची सवय होती. ते अधूनमधून लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावायचे. मात्र त्यांना कधीच लॉटरी लागली नाही. मात्र यावेळी त्यांचे नशीब चमकलं.
लॉटरीचे तिकीट काढल्यानंतर अवघ्या काहीतासात त्यांना लॉटरीचे तिकीट लागल्याचे कळले. ज्याचे स्वरूप 12 कोटी रुपये होते. ते कोट्याधीश झाल्याचे त्यांना विश्वासच बसत नव्हता. केरळ प्रशासनाच्या ख्रिसनस न्यू ईयर लॉटरीचा पहिला पुरस्कार जिंकून बातम्यांमध्ये आले होते. गेली अनेक वर्षे ते लॉटरीचे तिकीट काढत होते.
सदानंदन हे कुडेमपाडी येथे आपली बायको आणि मुलांसोबत एका लहान घरात राहतात. ते व्यवसायाने पेंटर रंगारी आहेत. कोरोना महामारीमुळे ते कसेबसे दिवस ढकलत होते. आता कोट्याधीश झाल्यानंतर मुलाच्या चांगल्या भविष्यसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. हे पैसे कुठे आणि कसे खर्च करावेत त्यासाठी सनीश आणि संजय या दोन मुलांच्या संगनमताने निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले आहेत.
एका वृत्तानुसार, सदानंद यांना टॅक्स आणि लॉटरी एजंटचे कमिशननंतर 7.39 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. केरळच्या लॉटरी विभागाने 47 लाखापैक्षा जास्त तिकीट विकल्या होत्या. या तिकीटाची किंमत 300 रुपये होती.