ताज्याघडामोडी

खायचं असेल तर खा; मटणाच्या ग्रेव्हीचा वाद टोकाला; हॉटेल मालकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

मटणाची ग्रेव्ही चांगली नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये ही घटना घडली. कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली […]

ताज्याघडामोडी

अभिनेत्याकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण; इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी देत उकळले पैसे

मुंबई पोलिसांनी टीव्ही अभिनेता अमित अंतिलविरोधात धमकावणं, लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण मुंबईतल्या एका शिक्षिकेनं मलबार हिल पोलीस ठाण्यात अमितविरोधात तक्रार दाखल केली. इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप संबंधित शिक्षिकेनं केला. पैसे दिले नाही तर मुलाचा जीव घेण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अमित अंतिलने टेलिव्हिजनवरील […]

ताज्याघडामोडी

रुग्णाच्या मृत्यूनंतही सुरू ठेवले उपचार; रुग्णालयाचे बिल पाहून…

एका रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचे बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांवर अनेक आरोप केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रुग्णाचा मृत्यू झाला होता पण डॉक्टरांनी जाणूनबुजून त्याच्यावर उपचार केले आणि लाखो रुपयांचे बिल केले. डॉक्टरांनी […]

ताज्याघडामोडी

‘पब्जी’च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात कृष्णा परमेश्वर साळवे हा शिक्षण घेतो. कृष्णाचे वडील ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघेच घरी होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता. मात्र, सहलीवरून घरी आल्यानंतर तो झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी केलेल्या दोरीने गळफास लावून […]

ताज्याघडामोडी

अंधश्रद्धा बेतली जिवावर मी तुला पुन्हा जिवंत भेटेन म्हणत तरुणाने केली आत्महत्या

आपण सध्या एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञानाच्या मदतीने विविध क्षेत्रांमध्ये आपण मोठी प्रगती केली आहे. तरीही काही व्यक्ती अंधश्रद्धा, जादूटोणा यांसारख्या गोष्टींच्या विळख्यात अद्याप अडकलेल्या आहेत.  आजही अनेकांचा अशा गोष्टींवर विश्वास आहे. याच अंध विश्वासापायी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तंत्र-मंत्राच्या जादूने पुन्हा जिवंत होण्यासाठी, एका व्यक्तीने स्वत:चीच हत्या करवून घेतली आहे. उत्तर […]

ताज्याघडामोडी

प्रेमिकेला भेटू दिले नाही, माथेफिरुने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत केलं भयानक कांड

छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूरमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे घडताहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्याच्या हत्येबाबत अजून धागेदोरे मिळाले नसले, तरी तोपर्यंत आणखी एक हत्या झाली आहे. या गुन्ह्यातल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शाळकरी मुलीवर प्रेम करणाऱ्या एका प्रेमवीराने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या केली. पोलिसांनी लगेचच त्यामागच्या सूत्रधाराला शोधून त्याला अटकही केली. प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे काही […]

ताज्याघडामोडी

लग्नापूर्वीच मुलाला जन्म देणाऱ्या 19 वर्षीय मुलीची वडिलांनी आणि मावशीने केली हत्या

तामिळनाडून एका 19 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला त्रिची सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि तिने कबुलीजबाब देण्याचा निर्णय घेतला. त्याआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन महिलेकडून जबाब नोंदविला. यानंतर रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. महिलेने विवाहपूर्व एका बाळाला जन्म दिला होता. यामुळे तिच्या वडिलांनी आणि मावशीने […]

ताज्याघडामोडी

केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर – आ. समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधामधून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. हुलजंती ते नंदेश्वर या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये तर जित्ती ते मरवडे या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ९ कोटी रुपये […]

ताज्याघडामोडी

कधी भीक मागितली, कधी चहाच्या दुकानात काम करुन जगला, ११ वर्षीय मुलगा निघाला लखपती

उत्तर प्रदेशातील सहरानपूरमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. भीक मागून जगणारा ११ वर्षांचा मुलगा चक्क लखपती निघाला आहे. करोना काळात संबंधित मुलाच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळं मुलाला पोट भरण्यासाठी भीक मागावी लागत होती. संबंधित मुलाच्या आजोबांनी त्याच्या नावावर संपत्ती करुन ठेवली होती. तेव्हापासून त्याचे नातेवाईक त्याला शोधत होते. आजोबांनी नातू एक दिवस […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरातील ‘त्या’ शिक्षण संस्थेने बांधलेले दुकान गाळे पाडून टाका

महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांचे आदेश पंढरपूर शहरातील बेकायदा बांधकामे,बांधकाम परवान्याच्या अटी आणि नियमाचे भंग करून करण्यात आलेली बांधकामे आणि सार्वजनिक जागांवर बेकायदा वाढत चाललेली अतिक्रमणे चर्चेचा विषय असतो.अनेक वेळा बांधकाम परवाना प्राप्त करण्यासाठी काही मालमत्ता धारक जो प्रस्तावित बांधकामाचा नकाशा सादर करतात त्याची चौकशी आणि पाहणी करून नंतरच सदर मालमत्ता धारकास वापर परवाना नगर पालिका प्रशासनाने […]