ताज्याघडामोडी

रुग्णाच्या मृत्यूनंतही सुरू ठेवले उपचार; रुग्णालयाचे बिल पाहून…

एका रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचे बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांवर अनेक आरोप केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रुग्णाचा मृत्यू झाला होता पण डॉक्टरांनी जाणूनबुजून त्याच्यावर उपचार केले आणि लाखो रुपयांचे बिल केले. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला आहे.’ रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊ गोंधळ घातला आहे. 

सोनीपतच्या राई गावात राहणाऱ्या धर्मवीर यांना कुटुंबीयांनी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी नातेवाईकांना तेव्हा धर्मवीर यांच्या उपचारासाठी चार लाख जमा करा असे सांगितले. शिवाय, ऑपरेशन झाल्यावर ते बरे होतील असे म्हटले होते. मात्र, उपचारादरम्यान कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना धर्मवीर यांना भेटून दिले नाही. कुटुंबीयांना शंका आली तेव्हा त्यांनी आम्ही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवतो असे सांगितले. त्याच वेळी नेमकं डॉक्टरांनी तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे असे सांगितले.

धर्मवीर यांचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी आणि नातेवाईक रुग्णालयाजवळ मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रुग्णाचा आधीच मृत्यू झाला होता. पण यांनी सांगितले नाही. दहा दिवसांचं 14 लाख बिल दिले आहे. एक गरीब कुटुंब एवढे पैसे कुठून आणणार? असा सवाल देखील कुटुंबाने विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *