राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील हजारो […]
ताज्याघडामोडी
मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची मागितली माफी
पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागतो – ना.तानाजी सावंत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर मराठा समाजाची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मराठा समाजातील पाळण्यातील बाळापासून ते ९० वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाची माफी मागत आहे, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. ज्या समाजात माझा जन्म झाला, […]
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाचा भरदिवसा खून
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वडगांव बुद्रुक येथे मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून करण्यात आला आहे. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे […]
दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, पालक अभ्यास करण्यास सांगतात म्हणून उचलले टोकाचे पाउल
दहावीच्या अभ्यासावर अधिक लक्ष दे, असा पालक तगादा लावतात, म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. यामुळे प्रभादेवी परिसरत मोठी खळबळ उडाली आहे. वरळीच्या सेंच्युरी मिल म्हाडा वसाहती मधील एका इमातीत ती विद्यार्थिनी पालकांसोबत राहत होती. दहावीत असल्याने अभ्यासावर अधिक लक्ष दे, असे पालक तिला शुक्रवारी रात्री […]
देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तावर काळाचा घाला, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. पण त्याआधीच बीडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तुळजापूर येथून देवीची ज्योत घेवून गावी निघालेल्या दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन तरुणांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण इथं ही घटना घडली. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव […]
जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी
उत्तर प्रदेशातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 2021 च्या एप्रिलमध्ये मृत्यू झालेल्या विमलेशची त्याची पत्नी मिताली दीक्षित आजपर्यंत सेवा करीत होती. केवळ पत्नीच नाही तर अख्ख घर या मृतदेहाची सेवा करीत होता. दररोज गंगेच्या पाण्याने त्याला स्वच्छ केलं जात होतं. कपडे बदलले जात होते. मुलं मृतदेहाला मिठी मारून देवाकडे बाबाला लवकर बरं करण्यासाठी प्रार्थना […]
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राची हत्या
अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राला दारू पाजून त्याचा दुपट्ट्याने गळा आवळून मित्रानेच हत्या केली. चांदूरबाजार लागत बिलालपूर ते सोनेरी मार्गावर एका शेत शिवारात ही घटना घडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बिलालपूर ते सोनेरी मार्गावर असणाऱ्या सुरेंद्र पात्रे यांच्या शेतात एदिलालपूर येथील रहिवासी संदीप याचा मृतदेह शनिवारी आढळून येताच खळबळ उडाली. प्रथमदर्शनी विष घेऊन […]
महावितरणच्या महिला तंत्रज्ञाचे डोके भिंतीवर आपटले
वीजबिलाची थकबाकी वसुली करणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर तिचे डोके पकडून भिंतीवर आपटण्यात आले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तुळशीबागेतील माळवी सुवर्णकार मंदिरजवळ ही घटना घडली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. पण, अधिकाऱ्यांकडून दबाव टाकताच कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. महाल विभागांतर्गत जुनी […]
दीड वर्षापासून मृतदेहासोबत राहतंय कुटुंब; कोरोना काळात झालेला मृत्यू; रोज डेटॉलने सफाई, तेलाने मालिश
उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळामध्ये गंगेत मृतदेह वाहत असल्याचे समोर आले होते. आता याच यूपीतील कानपूर शहरात कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांनी जपून ठेवल्याचे उघड झाले आहे. हे कुटुंब गेल्या दीड वर्षापासून पार्थिव देहासोबत रहात असून मृतदेहाची ममी झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. रावतपूरच्या कृष्णापुरी भागात राहणारे आयकर अधिकारी विमलेश सोनकर […]
४ दिवस पाऊस कायम राहणार, ‘या’ १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
राज्यातील काही भागांत २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २६ सप्टेंबर रोजी परभणी, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, […]











