ताज्याघडामोडी

जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी

उत्तर प्रदेशातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 2021 च्या एप्रिलमध्ये मृत्यू झालेल्या विमलेशची त्याची पत्नी मिताली दीक्षित आजपर्यंत सेवा करीत होती.

केवळ पत्नीच नाही तर अख्ख घर या मृतदेहाची सेवा करीत होता. दररोज गंगेच्या पाण्याने त्याला स्वच्छ केलं जात होतं. कपडे बदलले जात होते. मुलं मृतदेहाला मिठी मारून देवाकडे बाबाला लवकर बरं करण्यासाठी प्रार्थना करीत होते.

आई-वडील आणि भाऊ मृतदेहाला आक्सिजन पुरवित होते आणि सर्वजण विमलेश कधी उठून उभा राहिल याची प्रतीक्षा करीत होते. 17 महिन्यांपासून विमलेशच्या मृतदेहाची काळजी घेतली जात होती. त्याच्या घरातील सर्वांना विश्वास वाटत होता की, विमलेश जिवंत होईल. आता तो फक्त कोमामध्ये गेला आहे.

एकेदिवशी तो जिवंत होईल, असा सर्वांचा विश्वास होता. एका को ऑपरेटिव्ह बँकेत काम करणारी मिताली दररोज बँक जाण्यापूर्वी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून जात होती. त्याच्या शेजारी बसून न्याहाळत होती. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची.

विमलेशचे आई-वडीलदेखील त्याच्या मृतदेहाची काळजी घेत. डॉक्टरदेखील ही दूर्मीळ केस असल्याचं मानत होते. मात्र 17 महिन्यांपर्यंत काहीही न खाता कोणी जीवंत कसं काय राहू शकतं.

मात्र केमिकलशिवाय कोणताही मृतदेह सुरक्षित राहू शकत नाही. कुटुंबीयांकडून विमलेशच्या शरीरावर कोणत्याही केमिकलचा उपयोग केल्याचं मान्य केलेलं नाही. त्यामुळे तज्ज्ञांनाही यामागील नेमकं कारण कळू शकलेलं नाही. जीएसवीएम मेडिकल कॉलेजच्या एनाटमी विभागाचे प्रोफेसर डॉ.प्रमोद कुमार यांनी सांगितलं की, मेडिकलचे विद्यार्थी ज्या कॅडबरवर डिसेक्शन करतात, त्यात फार्मेलिन, ग्लिसरीन आणि कार्बोलिक अॅसिडचा लेप लावला जातो. या प्रक्रियेमुळे कोणताही मृतदेह यथावत ठेवला जाऊ शकतो.

हा लेप वा फार्मेलिन न लावता, कोणताही मृतदेह सुरक्षित ठेवला जाऊ शकत नाही. मांस चार दिवसांनंतर सडू लागतं. सात दिवसांनंतर यात किडे लागतात. कुटुंबीयांनी मृतदेहावर कोणत्या प्रकारच्या केमिकलचा उपयोग केला, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, केमिकलशिवाय मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे अद्याप केमिकलचं रहस्य सुटू शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *