ताज्याघडामोडी निविदा सूचना

विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद

कोणत्या गोष्टीवरुन जगात वाद होतील याचा काही नेम नाही. बीडमध्ये फिजिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, हा वाद एवढा विकोपाला पोहचल्यानंतर एकाने चक्क डोक्यावर पिस्तुल रोखल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. हर्षल केकाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांत दोघा क्लासेस चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी पंकज तांबारे आणि श्रीनिवास तांबारे हे दोघे फरार झाले आहेत. 2017 मध्ये लातूर येथे अविनाश चव्हाण हत्याकांड प्रकरण राज्यात गाजले होते. त्यानंतर आता बीडमध्ये देखील व्यवसायिक चढाओढीत छुपा संघर्ष समोर आलाय. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारदार हर्षल केकाण यांनी केलीय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला आहे.

मात्र या घटनेमुळं शिक्षणक्षेत्रातून आश्रचर्य व्यक्त केले जात असून, ज्यांचा समाजसमोर आदर्श असतो, तेच असे वागू लागले तर, बाकीच्यांनी कोणाकडे बघावे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *