एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात गुरुवार दिनांक २४ व २५ फेब्रुवारी रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या वेबिनारचे उद्घाटन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. ऋषिकेश देशपांडे […]
Uncategorized
“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे प्रशाले अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न”
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेअंतर्गत सोमवार, दि.२८.०२.२०२२ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातील प्रा.सचिन मधुकर बनसोडे व पंढरपुरचे नगरसेवक श्री नवनाथ रानगट सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांच्या आगमानानंतर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाचा […]
सिंहगडच्या इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल च्या माध्यमातून ” राष्ट्रीय स्टार्टअप दिवस ” उत्साहात संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने “इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल” च्या माध्यमातून द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी […]
खर्डी नजीक आरएमडी गुटखा पकडला,३० हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर तालुक्यातील खर्डी नजीक पोक भराटे, पोक/2116 गवळी असे मिळून पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सांगोल्याकडून खर्डीच्या दिशेने एक काळी रंगाची मोटार सायकल भरधाव वेगाने येत असल्याची दिसली. सदर मोटार सायकलचा रस्त्याचे बाजुस थांबवून त्याचे नाव विचारला असता त्यांनी त्याचे नाव प्रणव गणेश रोगे, रा. मु. पो. खर्डी, ता. पंढरपूर असे सांगितले. पंढरपूर […]
राजस्थान सरकारने जुनी पेंशन योजना लागू केली….तर महाराष्ट्रातील कर्मचारी अजुनही वंचितच
” महाराष्ट्रामध्ये जुनी पेंशन मागणीचा लढा हा अतिशय निर्णायक वळणावर आहे, गेली अनेक वर्षापासून सातत्याने ह्या मागणीसाठी प्रयत्न करत आहे.आता राजस्थान सरकारने राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू केली आहे,ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करून अभिनंदन केले आहे. आम्ही आशावादी,प्रयत्नवादी आहोत, आम्हालाही न्याय मिळेल.” दिपक परचंडे-शिक्षक सहकार संघटना महा.राज्य राजस्थान राज्यात गेली अनेक वर्षापासून […]
फॅबटेकच्या डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास भेट
सांगोला:येथिल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास व दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देण्यात आली. यावेळी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेविषयीची माहिती तसेच सर्व वार्ड बद्दलची सविस्तर माहिती घेण्यात आली.सदर उपस्थित विद्यार्थ्यांना आपण देखील आपल्या फार्मसी क्षेत्रात भविष्यात करत असलेली सेवा हि सदैव समाजउपयोगी व प्रामाणिकपणे केली पाहिजे असे यावेळी डॉ.साळुंखे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्येक्ष रुग्णालयाचे कामकाज कसे चालते याविषयी माहिती मिळाल्याचे समाधान वाटत आहे. याबरोबरच दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला या ठिकाणी डॉ.बनसोडे यांच्याकडून हॉस्पिटलच्या कामकाजाविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी देण्यात आली. हि क्षेत्रभेट संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्या उपस्थितीत व्यवस्थित पार पडली. या क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा.सुरज मणेरी व प्रा.मिस.रिचा फराटे यांनी केले.
पोलीस निरीक्षकास धमकी दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यावर होणार गुन्हा दाखल ?
बार्शीचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्या विरोधात सोशल मीडियावरून आरोप करत धमकी दिल्याबद्दल बार्शीतील नेत्यावर 332 353 भादवि कलम या प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी बार्शीचे शिवसेनेचे नेते व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी राज्याच्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलीस महासंचालकांकडे सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने […]
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
सांगोला: येथिल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शै. वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डी फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व द्वितीय वर्षींतील विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी फार्मसीचे दूरगामी होणारे फायदे सांगून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डी फार्मसी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सर्फराज काझी सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व स्टाफ यांची ओळख करून देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस, इत्यादी विभागांची माहिती करून दिली. पूर्ण वर्षाचे शेड्युल यावेळी विद्यार्थांना सांगितले. या वेळी फणी गेम्स, गीत व नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात मिस फ्रेशर व मिस्टर फ्रेशर यांची निवड करण्यात आली.मिस फ्रेशर म्हणून कु.साक्षी बालडे व मिस्टर फ्रेशर म्हणून चित्रक वाघमारे यांची निवड करण्यात आली. मा. प्राचार्य यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप प्रा. सुरज मणेरी यांनी केले.
पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापकांची सीओईपीला सदिच्छा भेट
इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल ४.० च्या निर्देशांनुसार, फॅब लॅब, मेकर्स स्पेस, डिझाइन सेंटर्स, सिटी एमएसएमई क्लस्टर्स, वर्कशॉप्स इत्यादीसारख्या प्री-इन्क्युबेशन युनिट्सना फील्ड किंवा एक्सपोजर व्हिजिटचे नियोजन करण्यासाठी तिमाही दोन मध्ये प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील प्राध्यापकांनी पुणे येथील सीईओपी ला सदिच्छा भेट दिली आहे. या भेटीदरम्यान काॅलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणेची फॅब लॅब सीओईपी […]
पंढरपूरात शहा प्रोव्हिजन किरणा किराणा दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास
पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असणाऱ्या विवेक दिलीप शहा यांच्या शहा प्रोव्हिजन स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.या बाबत विवेक शहा यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. दि.18/02/2022 रोजी विवेक दिलीप शहा यांनी रात्रौ 9/00 वा.मी दुकान बंद करुन शटरला कुलुप लावले व […]











