Uncategorized

सिंहगडच्या इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल च्या माध्यमातून ” राष्ट्रीय स्टार्टअप दिवस ” उत्साहात संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने “इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल” च्या माध्यमातून द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रामध्ये स्टार्टअप वर मार्गदर्शन देण्यासाठी पुणे येथील अँग्रो विभाग डायरेक्टर, पी एस पी आय पी अँड असोसिएशनचे डॉ. शिवराज काळे हे गुगल मीट द्वारे ऑनलाईन उपस्थित होते. यामध्ये त्यांनी स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून स्टार्टअप साठी लागणारी कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याबरोबरच त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. या चर्चासत्रांतर्गत स्टार्टअप ची गरज, त्यासाठी लागणारे वातावरण, विद्यार्थ्यांची क्रीटीव्हिटी स्टार्टअप पॅलिसी यासह इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी सह विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या वेबिनार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, यांनी डॉ. शिवराज काळे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. गणेश बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वैभव गोडसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *