Uncategorized

सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात वेबिनार संपन्न

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात गुरुवार दिनांक २४ व २५ फेब्रुवारी रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या वेबिनारचे उद्घाटन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. ऋषिकेश देशपांडे आदी मान्यवरांच्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
या वेबिनार मध्ये प्रा. वैभव कुलकर्णी हे “प्रोसेस ऑफ इनोव्हेशन डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी रेडिनेस् लेव्हल अँड कमर्शियलायशेन ऑफ लॅब टेक्नॉलॉजीज टान्सफर” या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. या वेबिनार मध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रा. वैभव कुलकर्णी यांनी केले.
९४% प्रकल्प हे महाविद्यालय पुरतेच मर्यादित राहतात व ६% प्रकल्प हे व्यवसायीक क्षेत्रामध्ये ठसा उमटवतात, या वस्तुस्तिथीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रकल्प आधारित शिक्षण महत्वाचे आहे . त्यासाठी डिस्कवरी आणि इन्व्हेंशनच्या पुढे जाऊन इंनोव्हेशन  वर लक्ष देण्याची गरज स्पष्ट केली. या प्रक्रियेतील काही महत्वाचे टप्पे जसे व्यवसायिक मनस्थिती, उद्दिष्टे, समस्या शोधणे , मार्केटच्या गरज शोधणे व त्याचे विश्लेषण, ग्राहकाच्या गरजा शोधणे, प्रश्नावली तयार करणे इत्यादी नमूद केले. या व्यतिरिक्त प्रोटोटाईप चे महत्व सांगितले.  
इम्पलेमेंटेशन ऑफ क्रीयेटिव्हिटी ऍण्ड डिझाईन थिंकिंग इन प्रोजेक्ट बेस लर्निंग या विषयावर तुकाराम वरक यांनी मार्गदर्शन केले.
हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्रा. राहूल शिंदे, प्रा. योगेश शिंदे, प्रा. संतोष बनसोडे, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. धनंजय गिराम, प्रा. उमेश घोलप आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहूल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *