शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात 8 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर श्री. भरणे यांनी या सूचना दिल्या. नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. […]
Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील गायी-म्हशींचे उत्कृष्ट पोषण व संवर्धन करणाऱ्या पशुपालकांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने पात्र व्यक्ति/संस्था/पशुपालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए.सोनवणे यांनी केले आहे. बेस्ट डेअरी फार्मर रिरींग इंडिजेनिअस कॅटल ब्रीडस् या पुरस्कारासाठी नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस करनाल, हरयाना संस्थेच्या मान्यताप्राप्त 50 देशी गोवंशीयपैकी कोणत्याही जातीचे पशुधन […]
सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगारांनी बीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा
इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत अल्प व्याजदराने कर्ज देण्यात येते. बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एन. मोहोरकर यांनी केले आहे. यंदाच्या 2021-22 या वित्तीय वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली […]
खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लाऊड क्लीनिक मशीनचे आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन
खर्डी तालुका पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लाऊड क्लिनीक मशीन आल्यामुळे एकाच वेळी 23 टेस्ट होणार आहेत. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. दररोज जास्त ओपीडी असणाऱ्या खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकाच वेळी 23 टेस्ट होणारी मशीन आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात […]
अवैध वाळू उपसा करण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यास बेदम मारहाण
पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ हद्दीतून माण नदीकाठावरून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात सातत्याने निदर्शनास आले असून नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या अवैध वाळू उपसा करणाऱ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.अवैध वाळू साठा अथवा वाळू उपसा करण्यास वाट देणाऱ्या शेतकऱ्यावर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने […]
ब्युटी पार्लरमध्ये फेशियल करायला गेलेल्या महिलेचे दागिने लंपास
पंढरपुर तालुक्यातील फुलचिंचोली येथील एक ५५ वर्षीय महिला दिंनाक 30/06/2021 रोजी सकाळी 11/30 च्या सुमारास गावातीलच एका ब्युटी पार्लर मध्ये गेलेली असताना सदर महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या सदर महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. […]
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदलीच्या चर्चेने पंढरपूर शहर तालुक्यात अस्वस्थता
पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या प्रांताधिकारी सचिन ढोले यांची बदली होणार असल्याच्या चर्चेने मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या शहर व तालुक्यातील गावागावातील सर्व सामान्य नागिरकांशी संपर्क ठेवत,तसेच सामाजिक व राजकीय पटलावर काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सामान्य जनतेच्या अनेक रखडलेल्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढला,अनेक वाद […]
खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत
खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक विमा योजनेसाठी 2021 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ www.pmfby.gov.in कार्यान्वित झालेले आहे. जिल्ह्यातील अधिसुचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा […]
तुझी जर्सी गाय दूध कमी देते म्हणत साडूची साडूला मारहाण
शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय भरभराटीस आला,पंढरपुर तालुक्यात चाळीस वर्षांपूर्वी पंढरपुरी म्हशी आणि गौळारू गायीच दुग्ध व्यवसायासाठी महत्वपूर्ण समजल्या जात होत्या.मात्र पुढे अधिकाधिक दुग्ध उत्पादन झाले पाहिजे यासाठी आग्रह धरला जाऊ लागला आणि त्यातूनच जर्सी गायीचे युग सुरु झाले.आणि आपल्याच गोठ्यातील गाय गावात सर्वात जास्त दूध देते हे दाखवून देण्याची चढाओढ लागली.मात्र कधी कधी […]
पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायकलची चोरी
पंढरपूर शहरात मोटारसायकल चोरीस जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अगदी घरासमोर,दुकानासमोर लावलेल्या मोटरसायकल देखील चोरटे शिताफीने लंपास करत असल्याचे दिसून येते.मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील दुचाकी मालकांकडून मात्र चिंता व्यक्त केली जाऊ लागली असून अगदी हॅन्डल लॉक केलेले असेल तरीही चोरटे अगदी काही वेळात गाडी चोरून नेत असल्याने बँका,बाजारपेठ,शासकीय कार्यालये आदी ठिकाणी मोटारसायकल घेऊन जाणे […]











