Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू होणार ?

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात 8 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर श्री. भरणे यांनी या सूचना दिल्या.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या सूचनेनुसार आता पंढरपूर तालुक्यातील कोरोना मुक्त असलेल्या गावातील शाळा सोमवार पासून नियमितपणे सुरु होणार का याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 
            या बैठकीत श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ज्या ठिकाणी गेल्या एक महिन्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही, अशा गावात 8 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. सुरू करण्यात येणाऱ्या शाळांचे सॅनिटायजेशन करून घ्या, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
या बाबत आदेश देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी,गेल्या एका महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसेल, तर त्या गावात शाळा सुरू करता येतील स्पष्ट केले होते.शाळा सुरू करताना सरपंच आणि मुख्याध्यापकांसह ७ सदस्यांची एक समिती नेमावी. पालकांशी चर्चा, कर्मचारी आणि शिक्षकांचे लसीकरण यानंतर लहान गटांमध्ये विभागून मुलांना शाळेत बोलवावं, असं या संबंधातल्या निर्णयात म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *