कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे. […]
Uncategorized
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत समर कॅम्पला उत्साहात सुरुवात’
मंगळवार, दि.१२.०४.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत समर कॅम्पला उत्साहात सुरुवात झाली आहे. पंढरपूरातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघरच. प्रशाला विद्यार्थ्यांना बाल-वयापासूनच अभ्यासासोबत इतर उपक्रम राबवत असते. विद्यार्थी केवळ पंढरपूकरीता आणि प्रशालेपर्यंत मर्यादीत न राहता सर्व क्षेत्रामध्ये प्रगल्भ व्हावा अशी यामागची भूमिका आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम […]
लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारिपाट” कथासंग्रहाला साहित्य पुरस्कार जाहीर
शेळवे (ता. पंढरपूर) येथील ग्रामीण लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” कथासंग्रहाला गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे देण्यात येणारा २०२१ चा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. जेष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांचे शुभहस्ते १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता.भुदरगड ) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी […]
आ.रोहित पवार यांना काल बोलायची राहून गेलेली गोष्ट !
काल कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदार संघातील भाविकांसाठी ६५ एकर पलीकडील शेगाव दुमाला अथवा भटुंबरे हद्दीत ते स्वतः उभारत असलेल्या संत छाया निवास या भव्य भक्त निवासाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला.आणि यावेळी मीही उपस्थित होतो. यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद देखील साधला पण गडबडीत असल्याने ते फारसा वेळ […]
१० वर्षानंतर पंढरपूर-विजयपूर रेल्वे मार्ग पुन्हा चर्चेत
सर्वेक्षणासाठी तातडीने बैठक घेण्याची मागणी २०१२ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने पंढरपूर- विजयपूर रेल्वे मार्गाची घोषणा केली होती.यावेळी या मार्गाचे लवकरच सर्व्हेक्षण केले जाईल अशी माहितीही देण्यात आली होती.पुढे २०१५ मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या.परंतु पुन्हा घोडे पेंड खाल्ले आणि सर्वेक्षणाचे काम थांबले.मात्र आता विजयपूर-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून आमदार समाधान […]
भगिरथ भालके विरोधात ‘दोघे’ एकत्र येणार कि स्वतंत्र लढणार ?
‘विट्ठल’ च्या याद्या मागवल्या,सुरु झाली सभासदांमध्ये चर्चा पूर्वाश्रमीचा अण्णा गट आणि तालुक्यातील परिचारक गट यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई या तालुक्यातील तीन पिढ्यानी गेल्या ४३ वर्षात अगदी जवळून पहिली आहे.आणि या राजकीय लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ती पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घातलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा एकेकाळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यचा शेअर होल्डर […]
५ एप्रिल रोजी भाजपचे पंढरपूर पंचायत समिती समोर हलगीनाद अंदोलन
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशा भोगवताधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दयावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या.मात्र स्थानिक पातळीवर याची अमलबजावणी न झाल्याने,जाचक अटी पुढे केल्या जात असल्याने पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोलीसह अनेक गावठाण हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना या योजने पासून वंचित रहावे लागले आहे.हि बाब लक्षात घेत ५ एप्रिल रोजी पंढरपुर पंचायत समितीसमोर […]
राष्ट्रवादी युवकने केला केक कापून एप्रिल फुल साजरा
1 एप्रिलचा दिवस म्हणजे केवळ मनोरंजनाचा आणि कधीही न पूर्ण होणाऱ्या आश्वासनांचा दिवस म्हणून अनेकांना परिचीत आहे व अनेकांनी तो अनुभवलेला ही आहे. याचीच प्रचिती म्हणून केंद्रातील मोदी सरकारने ज्या पध्दतीने सर्वसामान्यांना कधीही पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचे गाजर दाखवले व सत्तेवर येवून बसले आणि आता वरचेवर महागाईचा भस्मासूर वाढत असताना ही मुग गिळून बसलेल्या भाजप […]
‘विठ्ठल’ ला मिळणार राज्य शासनाकडून रखडलेले थकीत व्याज अनुदान
२०१४-१५ च्या गळीत हंगामात कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने सॉफ्ट लोन योजना मंजूर केली होती.राज्य शासनाने २०१४-१५ मध्ये गाळप हंगाम घेतलेल्या २२ सहकारी व खाजगी सहकारी साखर कारखान्यास व्याज अनुदान देण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला गेला होता.सॉफ्ट लोन योजनेत पात्र असलेल्या सहकारी साखर कारखान्याचे प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांनी […]
“निर्व्यसनी जीवन हेच यशस्वी जीवन”- डॉ. प्रसन्न भातलवंडे
श्री पाडुरंग प्रतिष्ठिन संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे, मध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दंत शल्यचिकित्सक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉ. प्रसन्न भातलवंडे उपस्थित होते.डॉ.प्रसन्न भातलवंडे यांचा सत्कार, प्रशालेचे प्राचार्य सिबानारायण दास यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. अनुजा मस्के यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून […]











