

शेळवे (ता. पंढरपूर) येथील ग्रामीण लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” कथासंग्रहाला गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे देण्यात येणारा २०२१ चा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
जेष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांचे शुभहस्ते १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता.भुदरगड ) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर आणि उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी दिली आहे.
सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे…
लेखक गाजरे यांचा “सारीपाट” कथासंग्रह समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे शुभहस्ते प्रकाशित झाला आहे.. लेखक अंकुश गाजरे यांची अनवाणी, सारीपाट सह सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.!