Uncategorized

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत समर कॅम्पला उत्साहात सुरुवात’

मंगळवार, दि.१२.०४.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत समर कॅम्पला उत्साहात सुरुवात झाली आहे.

पंढरपूरातील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघरच. प्रशाला विद्यार्थ्यांना बाल-वयापासूनच अभ्यासासोबत इतर उपक्रम राबवत असते. विद्यार्थी केवळ पंढरपूकरीता आणि प्रशालेपर्यंत मर्यादीत न राहता सर्व क्षेत्रामध्ये प्रगल्भ व्हावा अशी यामागची भूमिका आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम शिकण्याची विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असते. विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त क्रिएटीव्ह पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा मागील दोन वर्षामध्ये सुटलेला अभ्यासक्रम तसेच पाया मजबूत व्हावा या विचाराने विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था सुद्धा प्राचार्या सौ. सोनाली पवार यांनी शिक्षकांना मार्गदर्शनातून केली आहे. या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना ‘डान्स, म्युझिक, चित्रकला,  क्राफ्ट , मैदानी स्पर्धा, फन विथ मॅथेमॅटिक्स, फन विथ ग्रामर (मराठी, हिंदी, इंग्रजी), फन विथ सायन्स, संस्कारवर्ग अशा विविध उपक्रमांची सुरुवात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात सुरु झाली आहे. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांची ओळखसुद्धा झाली.

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चिफ ट्र्स्टी श्री रोहनजी परिचारक यांनी संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थी शाळेत शिक्षण आणि विषयासी जोडलेले ज्ञान  तर मिळवतो परंतु व्यक्तिमत्वाचा विकास करावयाचा असेल तर विविध उपक्रमांचा समावेश करणे आवश्यक आहे.

शाळेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार यांनी विविध क्रिडा आणि उपक्रम याबद्दल सांगताना म्हणाल्या की, अगदी पूर्व प्राथमिक पासुनच विद्यार्थी सर्वगुण संपन्न असला पाहिजे. खेळांमुळे विद्यार्थ्यांत सहकाराची भावना आणि कोणत्याही संकटांना हसत हसत समोरे जाण्याची वृत्ती निर्माण होते.

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ असे वचन आपल्याकडे ते शालेय जिवनातूनच सुरु व्हायला हवे. विद्या किंवा   शिक्षण ही जिवनातील महत्वाची बाजू आहे. विद्यासंपन्न होवून विद्यार्थी समाजात लोकांच्या आदराला पात्र होतो. त्याच्या शिक्षणाचा, विद्वत्तेचा समाजाला उपयोग झाला तरच जिवनाचा गाडा योग्य रुळावर चालेल असे मत कर्मयोगी विद्यानिकेतन परिवाराचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *