Uncategorized

५ एप्रिल रोजी भाजपचे पंढरपूर पंचायत समिती समोर हलगीनाद अंदोलन 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशा भोगवताधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दयावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या.मात्र स्थानिक पातळीवर याची अमलबजावणी न झाल्याने,जाचक अटी पुढे केल्या जात असल्याने पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोलीसह अनेक गावठाण हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना या योजने पासून वंचित रहावे लागले आहे.हि बाब लक्षात घेत ५ एप्रिल रोजी पंढरपुर पंचायत समितीसमोर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी,अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला आहे.   

या बाबत अधिक माहिती देताना लक्ष्मण धनवडे यांनी म्हणाले कि, देशातील कष्टकरी,गोरगरीब जनतेला पक्की घरे उपलब्ध व्हावीत या हेतूने केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री आवास योजना राबविण्यात येते.ग्रामीण भागातील विविध गावठाणे व पंचायतीच्या हद्दीत या योजनेची अमलबजावणी करताना मोठया जाचक अटी लादण्यात येत आहेत.ग्रामपंचायत मूळ मालक असलेल्या परंतु गेल्या २०-३० वर्षांपासून भोगवटादार असलेल्या सर्व सामान्य ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सातत्याने करून देखील त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आले आहे.त्यामुळे भाजपच्या वतीने २५ मार्च रोजीच जिल्हाधीकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले असून ५ एप्रिल रोजी पंढरपुर पंचायत समिती कार्यालयासमोर हलगीनाद अंदोलन करण्यात येणार आहे.   

बेघर अथवा लोकांना पक्की घरे मिळावीत या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अमलबजावणी वेळी सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असल्याने अनेक गोरगरीब योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहे असे सांगत या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लांबलचक यादीच पुढे ठेवली.यातील बऱ्याच अटी या अवाजवी व गैरलागू असून एकतर यातील त्रुटी दूर कराव्यात अथवा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून विहित वेळेत सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध केली जावीत अशीही आमची मागणी असल्याचे यावेळी लक्ष्मण धनवडे यांनी सांगितले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *