Uncategorized

बहिणीने गळा दाबून केली भावाची हत्या

नागपुरातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर आपल्या लहान भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, भावाने तिच्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते, त्यानंतर मुलीने प्रकरण लपवण्यासाठी भावाला जीवे मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघांनीही […]

Uncategorized

पंढरीत दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन

अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, पहाटेच दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे,अवैध दारू विक्री करणार्‍यांना नियमाचे उल्लंघन करीत दारु विक्रीस प्रतिबंध करणे तसेच इतरही नियमांना ढाब्यावर बसवून अनेक वाईन शॉप व परमिटरुम मधून दारू विक्री […]

Uncategorized

ना दुकान ना धंदा उद्योग तरीही सहज मिळतंय शॉप ऍक्ट लायसन्स

कोणाताही व्यवसाय कायदेशीर दृष्ट्या अस्तित्वात आहे, सुरु आहे याचा पुरावा म्हणून मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948 खाली दुकाने निरीक्षक यांच्याकडून देण्यात आलेले शॉप ऍक्ट लायसन्स् हे ग्राह्य धरले जाते. विविध भागीदारी फर्म स्व.मालकीच्या व्यवसायीक अस्थापना, दुकाने आदी व्यवसायीक ठिकाणी ग्राहकांना दिसेल अशा स्वरुपात शॉप ऍक्ट लायसन्स् लावलेले असावे असा नियम आहे. मात्र दुकान निरीक्षकांच्या […]

Uncategorized

युटोपियन शुगर्स ऊस उत्पादक व कामगार यांची दिवाळी करणार गोड

जागतिक पातळी वरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे व पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या साखर कारखान्यांना चांगला दिलासा मिळेल व पुढील तीन ते चार वर्षात साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर निघेल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल असा आशावाद सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.   कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन […]

Uncategorized

सहकार शिरोमणी कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

निसर्गाचे चक्र सतत बदलत असते, कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त्‍ पडतो त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर होतो, देशात सर्वात जास्त साखरेचे उत्पादन आपल्या राज्यात होते, साखरेचे उत्पादन वाढले की, साखरेचा दर कमी होतो आणि उत्पादन कमी झाले की दर वाढतो, त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा असे प्रतिपादन सहकार मंत्री […]

Uncategorized

बंद अवस्थेत असलेला कारखाना अभिजित पाटील यांनी केवळ एक महिन्यात सुरु केला :- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४(सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,उस्मानाबादचे आमदार कैलासदादा पाटील,सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील,सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते. हा कारखाना […]

Uncategorized

जनशक्ती संघटनेने पुकारलेल्या ऊस वाहतूकदारांच्या संपास संजय कोकाटे यांचा पाठींबा

सध्या सर्वच साखर कारखान्यांची गाळप सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे ऊस वाहतूकदार शेतकर्यांनी आपापले वाहन सज्ज करून ऊसतोडणी कामगार घेऊन येण्याची लगबग सुरू आहे बरेच वाहतूकदार लेबर घेऊनसुद्धा आलेले आहेत तरीसुद्धा ऊस वाहतूक दरवाढ किती देणार? हे कुठल्याही साखर कारखान्यांनी जाहीर केलेले नाही किंवा उसाचा पहिला हप्ता किती देणार ? एकरकमी देणार का ? […]

Uncategorized

पंढरपूर शहरातील पार्कींग स्पेसचा गैरवापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

निवासी बांधकाम परवाना घेऊन त्या जागेचा व्यवसायिक वापर केला जात असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते.तर अनेक ठिकाणी अशा जागेत दुकान गाळे,हॉस्पिटल आदींसाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते. हॉस्पिटलच्या ठिकाणी येणारे रुग्ण तसेच विविध लॉज,धर्मशाळा,शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी येणारे  यांच्या वाहनांसाठी पार्कींगची सुविधा तसेच रुग्णालयात ऍडमीट रुग्णांसोबत ग्रामिण भागातून येणार्या नातेवाईकांच्या मुक्कामाची व गाडी पार्कींगची सोय […]

Uncategorized

वनविभागामुळे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी

पंढरपूर-वनविभागाने हरकत घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली असून याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय रस्ते मंत्री मा.नितीन गडकरी यांना भेटून याबाबत सविस्तर माहिती सादर केली. या प्रश्‍नावर मा.नितीन गडकरी यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु यापैकी काही रस्ते हे वनविभागाच्या हद्दीतून जातात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे अशा रस्त्यांचा ताबा मिळत नाही. यामुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली आहे. पंढरपूर ते सांगोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील वनविभागाने हरकत घेतल्यामुळे मागील तीन वर्षा पासून येथील दोन किमी. रस्त्याचे काम रखडले आहे. याचा मोठा फटका या रस्त्यावरून दैनंदिन ये-जा करणार्‍यांना होत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, मालवाहतूक करणारे यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कोल्हापूर, कर्नाटक भागातून येणार्‍या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे मोठे खड्डे पडले असून यामुळे वारंवार अपघात होत आहेत. सदर सांगोला-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील वनविभागाच्या हद्दीतील काम तातडीने पूर्ण करावे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते आहे त्या स्थितीत वन विभागाची कोणतीही जमीन न घेता पूर्ण करावेत अशी विनंती आमदार प्रशांत परिचारक यांनी मा.नितीन गडकरी यांना केली. दरम्यान याबाबत मा.गडकरी यांनी सविस्तर माहिती घेत लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Uncategorized

२० हजाराची लाच स्वीकारताना सह.पोलीस निरीक्षक मिलिंद केदारला रंगेहाथ पकडले 

सासरी छळ केला जात असल्याची तक्रार विवाहितेने महिला सहाय कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे तक्रार दाखल केली होती.या ठिकाणी कार्यरत असलेला सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद केदार याने सदर प्रकरणी फिर्यादीच्या पतीस कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी पती भरत परदेशी याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर सदर […]