Uncategorized

पंढरपूर शहरातील पार्कींग स्पेसचा गैरवापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

निवासी बांधकाम परवाना घेऊन त्या जागेचा व्यवसायिक वापर केला जात असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते.तर अनेक ठिकाणी अशा जागेत दुकान गाळे,हॉस्पिटल आदींसाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते. हॉस्पिटलच्या ठिकाणी येणारे रुग्ण तसेच विविध लॉज,धर्मशाळा,शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी येणारे  यांच्या वाहनांसाठी पार्कींगची सुविधा तसेच रुग्णालयात ऍडमीट रुग्णांसोबत ग्रामिण भागातून येणार्या नातेवाईकांच्या मुक्कामाची व गाडी पार्कींगची सोय हा अतिशय महत्वाचा भाग असून आरोग्य विभागाकडून कुठल्याही हॉस्पिटलचा ना हरकत प्रमाण पत्र देताना सदर इमारतीस स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेला बांधकाम परवाना व्यवसायीक जागा (वाणिज्य प्रयोजन) म्हणून आहे काय? याची खात्री केली जाते.तसेच येथे असलेल्या पार्कींग व्यवस्थेचीही पाहणी केली जाते.मात्र तरीही शहरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये पार्किंगची व्यवस्था नाही.बांधकाम परवाना घेताना निवासी आणि प्रत्यक्षात मात्र े हॉस्पिटल्स सुरू केले आहेत अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणेबाबत कमतरता असल्याचे निदर्शनास येते.

पालिका कार्यक्षेत्रात येणार्या हॉस्पिटल्सची मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 1949 अंतर्गत नोंदणी व परवाना नूतनीकरण केले जाते.अग्निश्मन विभागाकडून हॉस्पिटलमधील सोयी सुविधा पाहून ना हरकत दाखलाफ दिला जातो. इमारतीची उंची,बांधकाम परवाना घेताना निवासी की व्यवसायीक वापरासाठी याचा खुलासा, एकूण क्षेत्रफळ, बेडची संख्या,अग्निरोधक यंत्रणा, नियमानुसार जिन्याची रचना, पार्कींंग अशा विविध सोयी सुविधा संदर्भात संबंधित हॉस्पिटल्सची तपासणी होते व मगच वापर परवाना दिला जातो.त्यानंतर हॉस्पिटल सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विशिष्ट अधिकार्यांकडून पाहणी केली जाते,सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता केली आहे का याची पडताळणी केली जाते नंतर हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी दिली जाते. बांधकाम परवानगीनुसार डिस्पेंसरी व निवासी बांधकामा दाखवीले जाते मात्र प्रत्यक्षात पूर्णपणे हॉस्पिटलचे बांधकाम करण्यात येते ही बाब महाराष्ट— प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार व उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अशा हॉस्पिटलवर वापर परवना रद्द करणयची कारवाई करणे बंधनकारक आहे.ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी अनेक हॉस्पिटल चालकाकडून पालीकेकडे चेंज ऑफ युज दाखल केले जावू शकते.मात्र त्यासाठी पार्कींग सुविधेची अट बंधनकारक आहे.अहमद नगर,नाशिक,औरंगाबाद,पुणे,मुंबई,ठाणे,कोल्हापूर,सोलापूरसह विविध महापालीका क्षेत्रात व नगर पालीका क्षेत्रात यापुर्वी याच मुद्दयावरुन कारवाई झालेली आहे.

मात्र पंढरपूरात कधी अशा स्वरुपाची कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही.1 मूल्यांकन नोंदणी पुस्तकामधील उतारा .2 मालमत्ता कराबाबत ना-देय प्रमाणपत्र3 नवीन मालमत्ता नोंदणी (नवीन इमारत)4 नवीन पाणी जोडणीकरीता परवानगी5 ड्रेनेज (मल:निस्सारण/गटार) जोडणी प्रमाणपत्र6 क्षेत्र (झोन) प्रमाणपत्र,7 क्षेत्र (झोन) नकाशा8 आरोग्य नाहरकत प्रमाणपत्र.9 रस्ता खोदकामासाठी परवानगी10 व्यवसाय करण्याकरीता नविन परवानगी.11 हॉस्पिटल नोंदणी आणि नूतनीकरण12 बांधकाम परवानगीकरीता पार्कींगबाबत प्रमाणपत्र.13 बांधकाम परवानगीकरीता (अंतिम) आगीसंबंधीचे ना-हरकत प्रमाणपत्र. हे कागदपत्रे हॉस्पिटच्या मान्यतेसाठी आवश्यक आहेत.मात्र त्याच बरोबर रुग्णाच्या नातेवाईकासाठी अन्न शिजविण्याची सोय व वाहने पार्कींंगची व्यवस्था याबाबतही अनेक नियम व अटी आहेत.मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.  या महत्वपुर्ण बाबीकडे अनेक जागरुक नागरिक दुर्लक्ष करतात. पंढरपूर शहरातीळ अनेक हॉस्पिटलच्या बाहेर भर रस्त्यातच पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पंढरपूर नगर पालीकेने व शहर वातहुक शाखेने याबाबत त्वरीत संयुक्त कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *