Uncategorized

परिस्थितीचे चटके सहन करत शेवटच्या श्वासापर्यंत लोककल्याणासाठी झटलेला लोकनेता वसंतदादा काळे

परिस्थितीचे चटके सहन करत शेवटच्या श्वासापर्यंत लोककल्याणासाठी झटलेला लोकनेता  सहकार शिरोमणी वसंतराव काळे होते असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब साळुंखे यांनी केले ते  वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली ता. पंढरपूर  येथे आयोजित वसंतदादा काळे यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते.   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामकृष्ण वीर महाराज होते यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे सहकार शिरोमणीचे व्हा. चेअरमन राजेंद्र शिंदे राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे विठ्ठलचे संचालक महादेव देठे उत्तम नाईकनवरे निशिगंधा बँकेचे व्हा. चेअरमन राजेंद्र जाधव यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे प्रतिभाचे चेअरमन विष्णू यलमार मारुती भोसले गंगाधर गायकवाड बिभीषण पवार सुधाकर कवडे युवा गर्जनेचे  संस्थापक समाधान काळे डॉ.सुधीर शिनगारे संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कौलगे संचालक दिनकर चव्हाण चंद्रकांत पाटील कांतीलाल काळे महादेव नाईकनवरे व सहकार शिरोमणी परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी  पुढे बोलताना साळुंखे  म्हणाले की सहकार अर्थकारण शिक्षण या त्रिसूत्रीच्या  माध्यमातून गाव खेड्यातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी वसंतदादा काळे यांनी  वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभा केले आज पूर्वीची गावखेड्यातील लोकसंस्कृती आणि ग्रामसंस्कृती मधील आनंद आता लोप पावत चालला आहे तो जतन करणे काळाची गरज आहे. दादांच्या जीवनचरित्रातून प्रबळइच्छाशक्ती आणि आत्मविश्वास हे गुण घेऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनीपुढील  वाटचाल करावी असे सांगितले . अध्यक्षस्थानावरून बोलताना रामकृष्ण वीर महाराज म्हणाले की  जीवन जगत असताना अनेक संकटाचा सामना करून दीपस्तंभासारखा आदर्श वसंतदादांनी आपल्या कार्यातून उभा केला तो सर्वांसाठी प्रेरणादायी  आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सांगितले की सहकार शिरोमणी वसंत दादा ने ज्या ज्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले होते त्या क्षेत्राशी संबंधित सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबून दादांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले जाते. काम करण्याची तयारी असेल तर विद्यार्थ्यांना निश्चित ध्येयापर्यंत पोहोचता येते यासाठी ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी कठिण परिश्रमाने आपले भवितव्य उज्वल करावे जिद्द आणि चिकाटीने दादांचा आदर्श समोर ठेवून  यश मिळवावे संस्था आपल्या पाठीशी ठाम पणे उभी राहील असे सांगितले .यावेळी माजी प्राचार्य शिवाजी बागल सुधाकर कवडे यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य दादासो खरात यांनी मानले. वसंतदादांच्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे प्रशालाचे माजी प्राचार्य हनुमंत जमदाडे संस्थेस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली .देणगीच्या ठेवीतून येणाऱ्या रकमेतून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना गुणवंत विध्यर्थी पारितोषक योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते  झाला.

Uncategorized

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांना साडी वाटप,तर आश्रितांना मिष्टान्न

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीनदलितांच्या उद्धार कार्यास मोठा त्याग करत योगदान दिलेल्या महामाता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे महिलांना साडी वाटप तर सर्व आश्रितांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले.तर पंढरपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील स्मारक समितीस माता रमाई यांची प्रतिमा भेट देण्यात आली.    […]

Uncategorized

कुटूंबासह बेपत्ता झालेले महावितरणचे अभियंता गणेश वगरे कर्नाटकात सापडले

एका संघटनेचा पदाधिकारी व दोन पत्रकार त्रास देत असल्याने पत्नी व दोन मी मुलीसह आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट करून दोन दिवसापूर्वी महावितरणचे सह अभियंता गणेश वगरे हे पत्नी व दोन मुलीसह गायब झाले होते.त्यांचे शेवटचे लोकेशन सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे दाखिवले गेले होते.ते मिसींग असल्याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]

Uncategorized

पंढरपुरातील राजकीय नेत्याशी संबंधित संस्थेस कराराने दिलेल्या जागे बाबत होणार लोकायुक्तांसमोर सुनावणी

पंढरपूर शहरातील एका राजकीय नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेस पंढरपूर नगर पालिकेची अतिशय मोक्यावरील जागा नाममात्र १ रुपया भाड्याने देण्यात आली होती.सदर जागेचा भाडेपट्टा सन २०१५ मध्येच संपुष्ठात आलेला आहे.या भाडेकराराचे नूतनी करणं करण्यात आले आहे का याबाबत तसेच याच परिसरात नगर पालिकेच्या मालकीच्या जागेत विना परवाना गाळे काढून भाड्याने देण्यात आले बाबत चंदकांत गावठे यांनी वेळोवेळी […]

Uncategorized

लोकनेते,दलितमित्र स्व.नारायणराव धोत्रे

११ व्या पुण्यतिथी निमित्त स्व.सुधाकरपंत परिचारक बहुद्देशीय संस्थेकडून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन लोकनेते स्व.नारायणराव धोत्रे यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मी अगदी जवळून पहिली आहे. त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे कामकाज नदीकाठच्या जुन्या इमारतीमधून चालत होते.बाबा कांबळे हे प्रशासनाधिकारी होते.आणि माझ्या मते नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेची कुठलाही गाजावाजा न करता अतिशय समर्पक सुरूवात जर कोणी केली असेल […]

Uncategorized

शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी ठोस सहकार्य केले जाईल

शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून कर्जपुरवठा करणे, असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे माजी राज्यमंत्री रयत क्रांती […]

Uncategorized

स्वेरी’ मध्ये एआयसीटीई–आयएसटीई इंडक्शन प्रोग्राम संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाला एआयसीटीई –आयएसटीई कडून इंडक्शन प्रोग्राम करिता मान्यता मिळाली होती. त्यानुसार प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘रिसेंट अॅडव्हान्सेस इन मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग’ या विषयावर दिनांक १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान एआयसीटीई –आयएसटीई प्रायोजित या राष्ट्रीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण प्रोग्राम आठवडाभर […]

Uncategorized

वडाळ्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत काकांनी सांगितले सभासद वाढवा

सभासद नोंदणी पुस्तके घेऊन पदाधिकारी परतले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या वडाळा, माऊली महाविद्यालय येथील तातडीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची वाटचाल आणि आगामी नगर पालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेत पक्षांतर्गत सुरु असलेली टोकाची गटबाजी आणि मोहोळ व पंढरपूर तालुक्यात या गटबाजीमुळे निर्माण झालेली परिस्थिती यावर काही […]

Uncategorized

जिल्ह्यातील अडचणीतील साखर कारखानदारांना मिळणार दिलासा

आ.बबनदादा शिंदे,कल्याणराव काळे,धनंजय महाडिक आदी उपस्थित सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेसह विविध वित्तीय संस्थाची थकबाकी लक्षात घेत या थकीत कर्जांचे पुनर्गठन करण्या बाबत आज राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुबंईत महत्वपूर्ण बैठक घेतली सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि पंढरपूर, भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी ता मोहोळ आणि […]

Uncategorized

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री सदानंद डिंगरे सेवानिवृत्त

पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सदानंद डिंगरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त लोकमान्य विद्यालयांमध्ये त्यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी  लक्ष्मण डिंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक अभय आराध्ये यांनी केले.त्यानंतर विद्यालयाच्या वतीने  सदानंद डिंगरे यांचा सत्कार करण्यात आला. […]