Uncategorized

जिल्ह्यातील अडचणीतील साखर कारखानदारांना मिळणार दिलासा

आ.बबनदादा शिंदे,कल्याणराव काळे,धनंजय महाडिक आदी उपस्थित

सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेसह विविध वित्तीय संस्थाची थकबाकी लक्षात घेत या थकीत कर्जांचे पुनर्गठन करण्या बाबत आज राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुबंईत महत्वपूर्ण बैठक घेतली सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि पंढरपूर, भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी ता मोहोळ आणि विठ्ठल रिफाईन शुगर लि.करमाळा या कारखान्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना अडचणीतुन बाहेर काढणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत सकरात्मक चर्चा झाली असून यंदाच्या गळीत हंगामात हे कारखाने चांगल्या पद्धतीने गाळप करीत असले तरी मागील थकबाकी मुळे कारवाईची टांगती तलवार होतीच.थकीत कर्जाचे पुनर्गठन झाल्यास या कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बैठकीस आमदार बबनराव शिंदे,साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकिय संचालक अजित देशमुख, बँकेचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, भिमा स.सा.का.लि.टाकळी चेअरमन माजी खासदार धनंजय महाडिक, विठ्ठल रिफाईन शुगर लि.चेअरमन विक्रमसिंह शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *