Uncategorized

लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री सदानंद डिंगरे सेवानिवृत्त

पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सदानंद डिंगरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त लोकमान्य विद्यालयांमध्ये त्यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी  लक्ष्मण डिंगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक अभय आराध्ये यांनी केले.त्यानंतर विद्यालयाच्या वतीने  सदानंद डिंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  प्रमोद पुरी, सौ जमदाडे मॅडम ,माजी शिक्षक  बाळासाहेब आराध्ये, आपटे उपलप प्रशालेचे मुख्याध्यापक  जयंत हरिदास, श्रीकांत देशपांडे ,सौ अंजली सदानंद डिंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   सत्काराला उत्तर देताना श्री डिंगरे सरांनी लोकमान्य विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे,अशी भावना व्यक्त केली. तसेच पंढरपूर नगर परिषदेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व अधिकारी वर्ग तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी लोकमान्य विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक श्री भारत गदगे सर,गौतम विद्यालयचे माजी मुख्याध्यापक श्री माने सर,श्री हेमंतराव कुलकर्णी सर, श्री संजय रत्नपारखी सर,श्री विक्रम शिंदे, श्री उत्तम माने तसेच सर्व डिंगरे कुटुंबीय व मित्रपरिवार,विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख  धनंजय मिसाळ यांनी केले. मनोज बोधले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक इरकल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *