गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाला एआयसीटीई –आयएसटीई कडून इंडक्शन प्रोग्राम करिता मान्यता मिळाली होती. त्यानुसार प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘रिसेंट अॅडव्हान्सेस इन मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग’ या विषयावर दिनांक १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान एआयसीटीई –आयएसटीई प्रायोजित या राष्ट्रीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण प्रोग्राम आठवडाभर ऑनलाइन स्वरूपात घेतला गेला असून या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या इंडक्शन प्रोग्रामचे उदघाटन आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई, आयएसटीई एफडीपी सेलचे संचालक डॉ. कर्नल व्यंकट व संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या इंडक्शन प्रोग्राममध्ये देशभरातून अनेक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. १८ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या इंडक्शन प्रोग्राम मध्ये डॉ.शरद वन्हाळकर, डॉ. डी.जी.ठाकूर, प्रा. व्ही सुदर्शन, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेशकुमार ह्याम, डॉ. शैला सुब्बारामन, प्रा. प्रकाश साळुंखे, डॉ. योगेश श्रीवास्तव, डॉ. एस.एम.पवार, डॉ. अमितव राय, प्रा. व्ही नटराजन, डॉ. एस. एन.आचार्य, डॉ. आर.एस. पावडे, डॉ. दीपक उनुणे, डॉ. जमीर अख्तर या सोळा संशोधकांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रामध्ये आयएसटीईचे कार्यकारी सचिव प्रा. व्ही.डी. वैद्य यांनी या ‘इंडक्शन प्रोग्रम’ च्या आयोजनाबद्दल स्वेरीचे कौतुक केले व येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे ज्ञान देण्यासाठी अशा इंडक्शन प्रोग्राम ची अत्यंत आवश्यकता आहे.’ असे प्रतिपादन केले.
समारोप सत्राचे अध्यक्षस्थान संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी भूषविले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. पवार यांनी ‘समाजोपयोगी संशोधनासाठी अशा पद्धतीचे इंडक्शन प्रोग्राम हे नाव संशोधकांना पथदर्शी ठरतात.’ असे सांगून संयोजन समितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा ‘इंडक्शन प्रोग्राम’ यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्षाचे विभागप्रमुख व प्रोग्राम समन्वयक डॉ. सतीश लेंडवे, प्रा. अमोल चौंडे, डॉ. संताजी पवार, डॉ. रंगनाथ हरिदास व इतर प्राध्यापकांनी प्रयत्न केले. आठवडाभर चाललेल्या या प्रोग्राममध्ये तब्बल १०० संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.