Uncategorized

सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन

   पंढरपूर (दि-18)-  सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे.  या लोकअदालतीमध्ये  सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. अशी माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी दिली आहे.

           जिल्ह्यातील ज्या पक्षकरांची प्रकरणे  सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटवावीत अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या लोकअदालती मध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा अभासी पद्धतीने सहभागी होऊ शकतात.

                    जिल्ह्यातील प्रकरणे मा.सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालती मध्ये  ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *