अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये गुणात्मक बदलासाठी महत्वपूर्ण प्रबंध सादर
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे विद्यापीठ मान्यता प्राप्त शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विषयाचे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रातील पेट ७ चे विद्यार्थी श्री दत्तात्रय औदुंबर मस्के यांनी विद्यापीठास अंतिम पीएच डी संशोधन प्रबंध सादर केला. पीएच डी मौखिक परीक्षेनंतर दत्तात्रय औदुंबर मस्के यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयातील पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या संशोधनाचा विषय ” सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक स्तरावरील भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक कार्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास ” असा होता.त्यांनी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर येथील प्राचार्य डॉ व्ही डी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच डी संशोधन कार्य पूर्ण केले. या त्यांच्या संशोधनामुळे उच्च माध्यमिक स्तरावरील भूगोल विषयाच्या अध्ययन अध्यापनामध्ये सकारात्मक परिणाम होतील.पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे विश्वस्त डॉ.मिलिंद परिचारक यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन भेटले.
उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापन करणारे शिक्षकांना सदर संशोधन उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या अध्यापनात गुणवत्तापूर्ण बदल होण्यास मदत होईल त्यांनी केलेल्या शिफारशी शासनास शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यांनी केलेले संशोधन वर्तमान काळातील येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना सुचवले आहेत त्यामुळे सरांचे संशोधन शासनाच्या शिक्षण खात्याला उपयुक्त ठरणार आहे. या संशोधन संस्थाचालक, पालक यांचे ज्ञानात भर घालणारे आहे. मस्के सर केवळ वर्गातील अध्यापन करून थांबले नाहीत तर दैनंदिन अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी नेहमी संशोधक वृत्तीने कार्य करीत आहेत. त्यांनी केलेला संशोधनामुळे शिक्षकास आपल्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरणार आहे.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बार्शी या संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी टी पाटील, सहसचिव ए पी देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य, कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एस गोरे, आयक्यूएसी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे, संशोधक मार्गदर्शक प्राचार्य डॉ व्ही डी पांढरे, पीएच डी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ एम व्ही मते, सर्व संशोधक मार्गदर्शक आदींनी अभिनंदन केले आहे.