Uncategorized

धक्कादायक! अ‍ॅमेझॉनचे पार्सल उघडताच बाहेर आला विषारी साप

कंपनीने दिले ‘हे’ उत्तर

बंगळुरु : काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवाचे बोट सापडले होते. तर दुसरीकडे अमुल आईस्क्रिमच्या डब्यात गोम आढळली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon) ही नावाजलेली कंपनी लाखोंच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र बंगळुरु येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला या कंपनीबाबत भीतीदायक अनुभव आला आहे. या दाम्पत्याने अ‍ॅमेझॉनवरुन एक पार्सल (Amazon Parcel) मागवले होते. मात्र पार्सल हाती येताच त्यात चक्क जिवंत साप बाहेर आला. हा साप पाहून दाम्पत्याची भीतीने गाळण उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दाम्पत्याने पार्सल मागवले होते ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी एक्स बॉक्स कंट्रोलर ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा त्यांचा बॉक्स आला तेव्हा त्यात चक्क साप निघाला. कोब्रा या जातीचा हा विषारी साप पाहून या दोघांची पाचावर धारण बसली. हा विषारी साप पॅकिंगच्या टेपमध्ये अडकला होता त्यामुळे सुदैवाने या दोघांना काहीही इजा झाली नाही. मात्र अ‍ॅमेझॉनसारख्या नावाजलेल्या कंपनीबाबत असा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *