जिल्हा परिषद प्राथामिक शाळा सुर्ली (पुनर्वसन) केंद्र तुंगत ता. पंढरपूर येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री. पांडुरंग मच्छिंद्र कुंभार यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर याच्याकडून पीएच.डी. ही, ‘शिक्षणशास्त्र’ विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. “सोलापूर जिल्हयातील निम्न प्राथमिक स्तरावर गणित विषयाच्या अध्ययन-अध्यापनात गणितपेटीच्या परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. त्यांना कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्यूकेशन, सोलापूर या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्री.बाळकृष्ण श्रीपाद भावे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मार्गदर्शक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. बोंदार्डे सर व सर्व प्राध्यापक वृंद, केंद्रप्रमुख काळुंगेसाहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. मारुती लिगाडेसाहेब यांनी अभिनंदन केले.
