ताज्याघडामोडी

प्रचारसभांवर दिल्ली हायकोर्ट संतापले

  विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांत कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्याच्या वस्तुस्थितीवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालय चांगलेच संतापले. मास्क न लावणाऱया सामान्य नागरिकांकडून मोठा दंड वसूल करताय, मग प्रचारासाठी विनामास्क फिरणाऱया नेत्यांना सूट का? हा दुजाभाव कशासाठी? असा खडा सवाल न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला केला आहे. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचेअर्ज अवैध

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज […]

ताज्याघडामोडी

”आता माघार घेऊ नका” महिला मतदारांची शैलाताई गोडसेंना विनंती

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीत करीत शैलाताई गोडसे यांनी आज पंढरपूर शहरातील इसबावी भागांमधील मतदार बंधू भगिनींच्या भेटीगाठी घेत आहेत. इसबावी भागातील महिला मतदार या सौ शैलाताई गोडसे यांचे उत्साहाने […]

ताज्याघडामोडी

अखेर शासनाचा आदेश आला

३१ मार्च पर्यंत निवडणुका स्थगित करण्याचा आदेश मागे  पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विठ्ठल सह्कारी साखर कारखान्यासह तालुक्याच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने जून २०२० मध्ये घेतला होता.३१ डिसेंबर नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचात निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर विजयी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्याचे धाडस कराल तर सावधान. कारण, विजयोत्सव मिरवणुका काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.१८ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे. यापार्श्‍वभूमीवर […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज तहसिलदार – विवेक सांळुखे

पंढरपूर, दि. 14:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी  331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी  1 हजार 736 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले  असून, निवडणुक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान […]

ताज्याघडामोडी

कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली.  बाधित आणि विलगीकरण कक्षातल्या व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची […]

ताज्याघडामोडी

सरपंच आणि सदस्यपदाचा लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतींना दणका, निवडणूक रद्द

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत […]

ताज्याघडामोडी

निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्र होते त्यापैकी एकूण 17 वार्ड बिनविरोध झाल्याने 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.   पंढरपूर तालुक्यातील 71 […]

Uncategorized

समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने नूतन न.पा.सभापती व बिनविरोध विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार 

                समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने दिनदयाळ मंदिर येथील कार्यालयात पंढरपूर नगरपालिकेच्या बिनविरोध निवडलेले बांधकाम समिती सभापती श्री सुरेश नेहतराव, व आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिनविरोध सदस्य झालेल्या संजयआप्पा अभंगराव(वाखरी) किरण साळुंखे, सौ रंजना शिंदे (अरण), सौ वैजयंती अधटराव व सौ कविता […]