ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले….

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसेच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली.राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही […]

ताज्याघडामोडी

‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि शाळा सुरु करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी! Covishield चा दुसरा डोस 4 आठवड्यात घेण्याची परवानगी द्या; कोर्टानेच दिला आदेश

ज्या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस 4 आठवड्यांनंतर इच्छा असेल, त्यांना तो उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. सध्या कोव्हिशिल्डच्या पहिल्या लसीनंतर किमान 84 दिवसांनी दुसरी लस घेण्याची परवानगी दिली जाते. मात्र ज्या नागरिकांना 4 आठवड्यानंतर ही लस घ्यायची असेल, त्यांना ती लगेच उपलब्ध व्हावी, असे आदेश कोर्टानं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल

तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाच गावांमध्ये  नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले आहे. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता […]

ताज्याघडामोडी

लसीकरणात भारताचा नवा विक्रम, एका दिवसात तब्बल 1.32 कोटी नागरिकांना डोस

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यात, लसीकरणातून एक चांगली बातमी आली आहे.कोरोना लसीकरणाबाबत भारतात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारताने एका दिवसात 1 कोटी 32 लाखांहून अधिक लसीचे डोस देऊन स्वतःचा जुना विक्रम मोडला. 31 ऑगस्ट रोजी एका दिवसात 1 कोटी 32 लाख 45 हजार 266 डोस दिले गेले. यामध्ये 1 कोटी 35 हजार 652 […]

ताज्याघडामोडी

कोरोनाची लागण झालेल्यांवर कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआर

सध्या देशात कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु आहे. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. दरम्यान लसीचे नेमके किती डोस घ्यावेत याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. आता आयसीएमआरच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये तेवढाच […]

ताज्याघडामोडी

कोरोना बाधितांना एक वर्षांनंतरही जाणवत आहेत साईड इफेक्ट

कोरोना झाल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम दीर्घकाळ राहत असून अनेकांना एका वर्षानंतरही ते जाणवत असल्याचं अभ्यासात म्हणण्यात आलं आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त सँपल साईज असणारा हा सर्व्हे असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकारचा ‘लॉँग कोव्हिड’ निम्म्या कोरोना रुग्णांना जाणवत असल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या […]

ताज्याघडामोडी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज- राजेश टोपे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (26 ऑगस्ट) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक […]

ताज्याघडामोडी

व्हॉट्‌सऍपवरून करा व्हॅक्‍सिन स्लॉट बुक

आता व्हॉट्‌सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करून तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्‌सऍपचे नवीन फिचर मायगव्ह (एमवायजीओव्ही) करोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्‌सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोन र्चूीें उीेपर कशश्रविशीज्ञ उहरींलीें वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंतर व्हॉट्‌सऍप उघडा आणि मायगव्ह करोना […]

ताज्याघडामोडी

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित

भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे.सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत. प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या […]