Uncategorized

करकंब येथील महा ई सेवा केंद्र चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे अन्न आस्थपणांची नियमित तपासणी करीत असताना त्यांना मे. आदिक किराणा स्टोअर्स, जळोली चौक, करकंब या पेढीची तपासणी केली. तपासणी वेळी सदर पेढीच्या अन्न नोंदणी प्रमाणपत्राविषयी अन्न सुरक्षा अधिकारी यांना शंका वाटली. त्यावरून श्री. कुचेकर यांनी लगेच केंद्र शासनाच्या फॉस्कॉस या संकेतस्थळावर जाऊन सदर नोंदणी प्रमाणपत्राची सत्यता तपासली असता सदर नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे व सदर नोंदणी प्रमाणपत्रात अनधिकृतपणे फेरफार केल्याचे लक्षात आले.
पेढी मालकाकडे सदर नोंदणी प्रमाणपत्रा विषयी अधिकची चौकशी केली असता सदर प्रमाणपत्र करकंब येथील महा ई सेवा केंद्र चालक श्री समाधान गुंड यांचेकडून प्राप्त झाले असल्याचे सांगितले.त्यामुळे पेढी मालक व महा ई सेवा केंद्र चालक यांचेवर बनावट प्रमाणपत्र तयार करने, वापरणे, शासनाचा महसूल बुडवणे यासह विविध कारणांसाठी भा द वी कलम ४१९, ४२०, ४६६, ४६८, ४७१, ४७४, ४७५ व ३४ या कलमांसह पोलीस स्टेशन, करकंब येथे पुढील तपासकामी महाराष्ट्र शासनातर्फे फिर्याद देण्यात आली आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न). श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *