ताज्याघडामोडी

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर शनिवारी होणार शिक्कामोर्तब

मागील तीन निवडणुकांच्या आकडेवारीचा फडणवीस यांनी केला अभ्यास 

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या बाबत मतदार संघात उत्सुकता शिगेला पोहोचली असून २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समाधान आवताडे हे तिसरा प्रबळ उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होते.या दोन्ही निवडणुकीत समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने क्रमांक २ ची मते दिली होती तर पंढरपुरात मोठी राजकीय ताकत असलेला परिचारक गट मात्र मंगळवेढा तालुक्यात फारसी प्रभावी कामगिरी करू न शकल्याने २०१४ आणि १९ च्या निवडणुकीत ते त्या तालुक्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 

   २०१४ च्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके याना ९१ हजार ८६३ तर प्रशांत परिचारक याना ८१ हजार ९५० मते मिळाली होती या निवडणुकीत समाधान आवताडे याना ४० हजार ९१० मतांवर समाधान मानावे लागले होते.तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय भारत भालके याना ८९ हजार ८८७ तर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक याना ७६ हजार ४२६ मते मिळाली होती.या निवडणुकीत समाधान आवताडे याना ५४ हजार १२४ मते मिळाली.   

            आता या पोटनिवडणुकीत आवताडे आणि परिचारक हे दोघेही भाजपकडून इच्छुक आहेत आणि भाजपकडून समाधान आवताडे याना उमेवारी देत २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत झालेली मतविभागणी टाळत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्याची व्युव्हरचना आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

शनिवारी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत या बाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार बद्दल नाराजी आहे याचा संदेश पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवाराच्या प्रभावातून देण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याची माहिती असुन स्व.भारत भालके यांनी २०९ ते २०१९ या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या मतांची आकडेवारी आणि यातील बलस्थाने याचा अभ्यास स्वतः देवेंद्र फडणवीस हे करत असून शनिवारी ते पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *