गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

२४९ चा जीओचा ऑनलाईन रिचार्ज पडला महागात

बँकेच्या नावे फेक फोन कॉल करून गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामध्ये बहुतांश वेळी वयोवृद्ध,अशिक्षित व्यक्ती मोबाईल वर आलेल्या कॉलला फसतात आणि आपला एटीएम क्रमांक,पिन सांगून बसतात.

यामुळे अनेकांना लाखोंचा फटकाही बसला असून या बाबत रिजर्व बँकेसह विविध बँका सातत्याने सावधानता बाळगा अशा सूचनाही देत असतात.पंढरपूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून या घटनेत कुणा अशिक्षित वयोवृद्ध व्यक्तीस फटका बसला नसून तालुक्यातील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तरुणास यावेळी या सायबर चोरटयांनी इंडसइंड बँकेच्या नावे बनावट मोबाईल कॉल करून अवघ्या काही वेळात एफ.डी,आरडी आणि सेव्हिग खात्यातील २ लाख ४१ हजार रुपये लंपास केले आहेत.

या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार 02/12/2021 रोजी फिर्यादी प्राध्यापकाने मोबाईल फोन वरून इंडुसएड बक खात्यावरून 239 रूपयाचा ऑनलाईन जीओ नबर चा रिचार्च केला परंतु तो यशस्वी झाला नाही.त्यामुळे फिर्यादीने सदर बँकेच्या कस्टमर केअर ला कॉल केला परंतु तो रिसिव्ह झाला नाही.थोडयाच वेळात फिर्यादीच्या मोबाईलवर 917857815751 वरून कल आला समोरच्या व्यक्तीने मी इंडुसएड बकेतुन बोलत आहे तुमचा काय प्राब्लम आहे असे हिन्दी मधुन विचारले.

सदर व्यक्तीने तूमचे बकेतील खाते अबडेट करण्याची गरज आहे. तुम्हाला लिंग सेन्ड करतो त्यावरील माहीती भरा त्याने मला WWW.SURVEYMONKEY.COM/R/KNF63 FG हि लींक पाठवली. सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीस फिर्यादी प्राध्यापकाने ओटीपी सांगितल्या नंतर खात्यातील फिक्स डिपझीट ,आरडी खात्यावरील व सेव्हिंग खात्यावरील अशी एकुण 241000/- रू रक्कम पेटीएम व्दारे खाते नंबर 00993564610079 वरती पाठवुन वरील मोबाईल नंबर 917857815751 वरील आज्ञात इसमाने माझी फसवुनक केली आहे अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *