ताज्याघडामोडी

भाजपाच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ बी.पी.रोंगे यांची निवड

भाजपाच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्ष पदी डॉ बी.पी.रोंगे यांची निवड
पंढरपूर- भारतीय जनता पार्टीच्या शिक्षण संस्था आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिटयुटचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य,शिक्षणतज्ञ डॉ बी.पी.रोंगे यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी निवडीचे पत्र देवून जबाबदारी वाढविण्यात आली.  
       पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वसंध्येला डॉ. रोंगे सरांची ही निवड झाल्यामुळे भाजपची बाजू अधिक भक्कम  झाली आहे. यावेळी आमदार प्रशांत परिचारक,युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, पांडुरंग साखर कारखाण्याचे व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख यांच्या सह पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते  व आदी मान्यवर उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा  राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, व राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ध्येय धोरणे, केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. रोंगे यांना जबाबदारी सोपवली आहे. मुळातच उच्च शिक्षित व अभ्यासू नेता असलेल्या डॉ. रोंगे सरांची निवड झाल्यामुळे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पसरले आहे. याचा फायदा भाजपाला या निवडणुकीत होणार आहे. यावेळी डॉ. रोंगे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या अगोदर शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवत राज्यभर चर्चेत असलेले डॉ. रोंगे यांनी यापूर्वी विविध पदे भूषवली आहेत. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार घेताना डॉ. रोंगे म्हणाले ‘ दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेवून पुढील दिशा ठरविणार आहे.’ नुतन जिल्हाध्यक्ष पदी डॉ रोंगे यांच्या निवडीने जिल्हयात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *