

दुरुस्तीच्या कामासाठी पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक २४ कि.मी.431 7/8 हे रेल्वे गेट मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजले पासून ते शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यत दुरुस्तीच्या कामामुळे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहे.
तरी या ५ दिवसाच्या कालावधीत कोर्टी -टाकळी बायपास रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतुकीसाठी कालावधीत पंढरपूर शहरातील पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन सिनियर सेक्शन इंजिनिअर (रेल पथ) मध्य रेल यांच्या वतीने करण्यात आले आहे.