ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली सणासाठी प्रत्येकी सभासदास 50 किलो साखर वाटप. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली सणासाठी प्रत्येकी सभासदास 50 किलो साखर वाटप.
कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ
पंढरपूर (प्रतिनिधी) –  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाज्या साखर विक्री केंद्राचे शुभारंभ व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे हस्ते व कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद यांचे हस्त्े करण्यात आले. यावेळी संचालक दिनकर चव्हाण, सुधाकर कवडे, युवराज दगडे, व ऊस उत्पादक सभासद सज्जन भायगुडे, बाळु चव्हाण,कारखान्याचे आधिकारी डेप्यु.जनरल म्ॉनेजर के.आर.कदम व कर्मचारी उपस्थित होते.  
सहकार शिरोमणी कारखान्याचे वतीने ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात प्रत्येकी 50 किलो साखरेचे वाटप कारखाना कार्यस्थळावर व पंढरपूर येथील प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्था या दोन ठिकाणी साखर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर साखर विक्री सकाळी 10 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सुरु असून त्याची अंतिम मुदत दि.20 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. साखरेचे कुपन चिटबॉय मार्फत सभासदांना घरपोच करण्यात आले असून संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी   साखर कुपनासह स्वत:चे आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून साखर घेण्यात यावी कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे  सर्व सभासद शेतकज्यांनी आपले कुटूंब आपली जबाबदारी या अभियानाचे पालन करावे व साखर घेताना स्ॉनिटायझर,मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर ठेवून  कारखाना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *