

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक ठिकाणी अथवा घरासमोर लावलेली दुचाकी लंपास करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.गर्दीचे ठिकाणे हेरून मोटारसायकल चोर आपली करामत दाखवत असल्यामुळे दुचाकी मालकांचे टेन्शन मात्र चांगलेच वाढले आहे.अशातच मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात अशी खंतही अनेक दुचाकी चोरीस गेलेले नागरिक खाजगीत व्यक्त करताना दिसून येतात.
लक्ष्मी टाकळी येथील एक किरकोळ भाजी विक्रेता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भल्या पहाटे ठोक भाजी खरेदीसाठी आला खरा पण एच.एफ.डिलेक्स कंपनीची मोटर सायकल काळ्या रंगाची गाडी सिलव्हर रंगाचा पट्टा असलेली नं.MH 13 BW 6726 ही हँन्डल लाँक करून मार्केट यार्ड येथील गरीब नवाज या हाँटेल समोर लावून भाजी खरेदीसाठी गेला असता हि दुचाकी दिनांक ३ मार्च रोजी चोरीस गेली आहे.या या बाबत दिनांक 09/03/2021 रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रमांक 136 नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.