

पंढरपूर शहर परिसरात गेल्या काही दिवसात रात्री बरोबरच दिवसाही चोरटे आपली करामत दाखवू लागले असल्याचे दिसून येत असून मोटार सायकल चोरी हि नित्याची बाब ठरली आहे.काही दिवसापूर्वी इसबावी येथील लग्नघरी भरदिवसा चोरटयांनी मोठा डल्ला मारला होता आज पंढरपूर शहरातील गजबजलेल्या लिंक रोड परिसरातील सिंगन नगर येथे पुन्हा एकदा असाच प्रकार घडला असून मंदिर परिसरात व्यवसाय असेल्या एक व्यापारी आपल्या कुटूंबासह मंगळवार दिनांक ९ मार्च रोजी देवदर्शनाला गेले असता भर दुपारी चोरटयांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा 2 लाख 46 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रमांक ०१४२ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि ३८०, ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.