Uncategorized

पंढरपूरमध्ये वृक्ष लागवडीखाली सरकारची फसवणूक प्रकरणी अधिकारी निलंबित

 राज्यभरातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच अहवाल सादर करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे वृक्षलागवड योजनेच्या नावाखाली राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

             विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली होती.

            राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले33 कोटी वृक्ष लागवडीप्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून या चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री.भरणे यांनी सांगितले.

            यासंदर्भात लक्षवेधी सदस्य किशोर दराडेमनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधील वृक्षलागवड योजनेबाबत अफरातफर झाल्यामुळे संबंधित वनक्षेत्रपाल अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *