ताज्याघडामोडी

वारक-यांच्या सेवेसाठी “रोटरी क्लब व सिंहगड कॉलेजचे” माहिती व मदत केंद्र”

पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त आलेल्या वारक-यांना गर्दीच्या काळात मदत व्हावी म्हणून यावर्षी प्रथमच आषाढी वारी मध्ये “पंढरीची वारी” हे मोबाईल अँड्रॉइड अँप सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या अँपची माहिती वारक-यांना व्हावी म्हणून पंढरपूर रोटरी क्लब व सिंहगडचे विद्यार्थ्यांकडून सावरकर चौक येथे माहिती व मदत केंद्र कार्यालय रविवार दि. १० जुलै रोजी वारक-यांच्या सेवेसाठी कार्यान्वित होते.

यामध्ये रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी ज्या वारक-यांकडे ॲनराॅइड मोबाईल आहेत अशा वारक-यांना व भाविका मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन “Pandharichi wari” या नावे असलेले अँप डाऊनलोड करून दिले व त्यामध्ये वारीचे मुक्काम ठिकाण, पोलीस स्टेशन, मंदिर, पाण्याचा टँकर, हाॅस्पिटल, वाहनतळ, शाळा, शौचालय, जवळपासची शासकीय कार्यालय आदी गोष्टी माहिती देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
यामध्ये जवळपास दोन हजार हुन अधिक भाविकांना रोटरी क्लब व सिंहगड च्या विद्यार्थ्यांकडून “पंढरीची वारी” अँपची माहिती देण्यात आली.

यामध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, रो. सोमेश गानमोठे व रोटरीन अमरीश गोयल, रो. विश्वास आराध्ये , रो. श्रीरंग बागल , रो. संजय कपडेकर , रो. किशोर निकते , रो. बापूसाहेब पाखरे, रो. दादासाहेब सरडे, रो. राजेंद्र केसकर, रो. जयंत हरिदास, रो. महेश निर्मळे, रो. सागर बेंगलोरकर, रो.अजिंक्य पांढरे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *