यंदा पाऊस कमी पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यानच राज्यातील काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उत्तर महाराष्ट्रात गारपीट पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतही पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने राज्यात येत्या ३-४ दिवसांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.हवामान विभागाने कोकण किनारपट्टीतील मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24, 25, 26, 27 आणि 28 नोव्हेंबर या पाच दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या रविवार आणि सोमवारी या दोन दिवसांसाठी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तत्पूर्वी, उत्तर भारतात २६ नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र (पश्चिमी विक्षेप) तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम वायव्य आणि पश्चिम भारतावर पडण्याची शक्यता आहे.