जया एकादशी माघ शुध्द ॥ ११९ दि.२३/०२/२०२१ रोजी संपन्न झाली. या यात्रा कालावधीत माघ शुध्द त्रयोदशीला श्री.विठ्ठल सभामंडप येथे श्री.ह.भ.प. औसेकर महाराज यांची चक्रीभजन झाले आहे. त्यानुसार आज माघ शुध्द त्रयोदशी गुरूवार, दि.२५/०२/२०२१ रोजी श्री.ह.भ.प. गुरूबाबा औसेकर महाराज यांचे श्री.विठ्ठल सभामंडप येथे दु.२.०० ते ५.०० या वेळेत चक्रीभजन परंपरेनुसार संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, मा.सदस्य श्री.संभाजी शिंदे, तसेच कार्यकारी अधिकारी श्री.बिड़ल जोशी, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड उपस्थित होते. प्रतिवर्षी या चंक्रीभजनासाठी १००० ते १२०० भाविक सभामंडपात असतात. परंतू यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सदरचे चक्रीभजन प्रतिकात्मक व मयादित स्वरूपात १५९१ व्यक्तीमध्ये पार पाडण्यात आले. सदर भजनाच्या दरम्यान कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईजर व मास्क चा वापर करण्यात येवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.
