Uncategorized

अंबाबाई मंदिर,रोकडोबा मारुती मंदिरासह ४ परिवार देवता मंदिर व सभामंडप जीर्णोद्धाराच्या कामाचे भुजीपूजन   

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरेसमितीने परिवार देवतांच्या मंदिरांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या पॅनलवरील आर्किटेक्ट श्री.प्रदिप देशपांडेयांची आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.या परिवार देवतांच्यामंदिरांचा जिर्णोद्वार सेवाभावी तत्वावर मोफत करण्याची दानशुर देणगीदारांनी इच्छाव्यक्त केली होती.या सर्व कामांचा भुमिपुजन समारंभ  गुरूवार,दिनांक 25/02/2021 रोजी मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मंदिर समितीचेमा.सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री.संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर),सौ.साधना भोसले तसेच कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाडतसेच संबंधित देणगीदार श्री.पाचुंदकर पाटील, श्रीकांत कोताळकर व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

रिध्दी सिध्दी गणपती मंदिर गोपाळपूर रोड जीर्णोद्धारासाटी देणगीदार/मंदिर निधीच्या माध्यमातून 16.50 लाख रुपये,श्री.लक्ष्मण पाटील मंदिरासाठी राम बचन यादव मुबई यांच्याकडून ८ लाख रुपये अंबाबाई पटांगण येथील अंबाबाई मंदिर जीर्णोद्धारासाठी दीपक नारायण करगळ पुणे यांच्याकडून २५ लाख रुपये रोकडोबा मंदिर हरिदास वेस जीर्णोद्धारासाठी श्रीकांत विजय कोताळकर यांच्याकडून २३ लाख रुपये सोमेश्वर मंदिर महाद्वार साठी असीम अशोक पाटील कोल्हापूर यांच्याकडून २५ लाख रुपये तर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप येथील सागवानी कामासाठी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील पुणे यांच्याकडून ३० लाख रुपये अशा प्रकारे १ कोटी २७ लाख ५० हजार रुपये खर्च या साठी देणगीरूपात केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *