ताज्याघडामोडी

खासदाराची चिट्ठी लिहून मुंबईच्या हॉटेलमध्ये आत्महत्या 

खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे खासदार असून ते मुंबईत काही कामानिमित्त आले होते. मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीन रुम नंबर 503 येथे ते थांबले होते. पण सकाळी हॉटेल स्टाफ त्यांच्या रुममध्ये रुम सर्विस द्यायला गेले असता कोणीच दरवाजा उघडला नाही.

मोहन डेलकर यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर जो त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. तो देखील मोहन डेलकर थांबलेल्या रुमजवळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास आला आणि त्याने दरवाजा ठोठावला तसंच मोबाईलवर फोन केला पण काहीच उत्तर आलं नाही. शेवटी हॉटेल स्टाफला त्याने मास्टर की ने दरवाजा उघडायला सांगितले. पण आतून मोहन डेलकर यांनी कडी लावल्याने दरवाजा उघडत नव्हता. शेवटी मोहन डेलकर यांचा ड्रायव्हर बाजूच्या रुममध्ये गेला आणि डेलकर यांच्या गॅलरीत उडी मारुन त्याने डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या रुममध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच त्याला हॉलमध्ये डेलकर यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

या दरम्यान हॉटेल रुमची झडती घेतली असता गुजरातीमध्ये लिहिलेली एक 7 पानी सुसाईड नोट मोहन डेलकर यांच्याजवळ सापडल्याची चर्चा असून . त्या सुसाईड नोटमध्ये बिहारमधील जेडीयूच्या एका वरीष्ठ नेत्याला आणि केंद्रातील एका प्रमुख मंत्र्यांला संबोधून ती सुसाईड नोट मोहन डेलकर यांनी लिहिल्याची चर्चा आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *