ताज्याघडामोडी

वाखरी-श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व देगांव-अहिल्या देवी चौक, भटुंबरे पर्यंत रस्त्याचे होणार कॉंक्रेटीकरण केंद्रीय मंत्री गडकरी यांची कार्यतत्परता -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर – आळंदी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वाखरी ते पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत भाग वगळण्यात आला होता. या दोन्ही महत्वाचा टप्पा वगळण्यात आला होता. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर तातडीने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी वाखरी-सरगम चौक ते श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरापर्यंत व पंढरपूर व पंढरपूर ते मोहोळ या महामार्गावरील गोसावीवाडी (देगाव)-तीन रस्ता ते अहिल्यादेवी चौक (भटुंबरे) पर्यंत या दोन्हीही भागाची आज आमदार प्रशांत परिचारक यांचे समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) प्रकल्प संचालक श्री.बोडके, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंढरपूर चे श्री.गावडे, श्री.बागल उप अभियंता बांधकाम विभाग यांनी पाहिणी केली.  
मा.नितीन गडकरी यांनी सदर रस्ता वाखरी ते श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, पंढरपूर व पंढरपूर ते गोसावीवाडी (देगाव) पर्यंत करण्यास हिरवा कंदील दिला आहे. विशेष म्हणजे याची त्यांनी तातडीने अंमलबजावणी करून अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यामुळे बुधवारी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी पंढरी गाठली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर ते वाखरीपर्यंत व गोसावीवाडी (देगांव) त्यांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये सरगम चौक येथे ओव्हर ब्रीज करता येइल का? याचीही चर्चा करण्यात आली. 
या रस्त्यावरून ज्ञानोबा तुकोबासह शेकडो दिंड्या आषाढीस मार्गक्रमण करतात. त्यांच्याबरोबर लाखो भाविक पायी पंढरीत दाखल होतात. यामुळे वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा रस्ता कॉंक्रीटचा करण्यात येणार आहे. तसेच पंढरपूर पासून चार किलोमीटर अंतरावर असणार्‍या गोसावीवाडी येथून शहरासाठी रिंगरोड होणार आहे. तेथपर्यंत हा रस्ता होणार आहे. सदर अधिकार्‍यांनी या बारा किलोमीटर रस्त्याची पाहणी केली.  
आमदार प्रशांत परिचारक यांनी अधिकार्‍यांना वाखरी येथील रिंगण सोहळा, त्यानंतर दशमीला सायंकाळी या सर्व पालख्या वाखरी ते पंढरपूर हे ६ किमी अंतर एकत्रित मार्गक्रमण करतात. त्यामार्गाने सुमारे १५ ते २० लाख वारकरी चालत येतात. आदी सविस्तर माहिती दिली. वाखरी ते पंढरपूर या ठिकाणी दुभाजकासह चारपदरी रस्ता आहे. त्याठिकाणी नवीन जमीन भुसंपादीत करण्याची गरज नाही. यामुळे दोन्ही रस्त्याचे अंदाजे १२ किमीचा टप्पा कॉंक्रीटीकरण करून दिल्यास पुढील अनेक वर्षाची वारकर्‍यांची व पंढरपूकरांची कायमस्वरूपी सोय होवुन खर्‍या अर्थाने हा आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वाला जाणार आहे.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांचे समवेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) प्रकल्प संचालक श्री.बोडके, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अनिकेत मानोरकर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंढरपूर चे श्री.गावडे, श्री.बागल उप अभियंता बांधकाम विभाग-पंढरपूर, पंढरपूर नगरपरिषदचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *