ताज्याघडामोडी

विठ्ठल मंदिरापासून थेट वाखरी बायपास पर्यंतच्या रस्त्याचे होणार कॉक्रीटीकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,बांधकाम विभाग व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आध्यात्मिक महत्व ओळखून श्रीक्षेत्र आळंदी ते मोहोळ हा रस्ता पालखी मार्ग म्हणून चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेत तात्काळ निधीही उपलब्ध करून दिला होता.या रस्त्याचे काम जवळपास ८० टक्के पूर्णत्वास आलेले असतानाच विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतीच दिल्ली येथे ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन वाखरी बायपास पर्यत आलेले रस्त्याचे कॉक्रीटीकरण व चौपदरीकरण पुढे सरगम चौकापर्यंत वाढविण्यात यावे तसेच हा कॉक्रीट रस्ता पुढे थेट विठ्ठल मंदिरापर्यंत करण्यात यावा अशी मागणी केली होती.ना.गडकरी यांनी या मागणीस हिरवा कंदील दाखविला असून आता थेट विठ्ठल मंदिरापासून ते सरगम चौक हा रस्ता कॉक्रीटीकरण तर पुढे सरगम चौक ते वाखरी बायपास हा रास्ता चौपदरीकरणासह कॉक्रीटीकरण करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

आज आमदार परिचारक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री घोडके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गावडे,उपअभियंता श्री बागल तसेच नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसट,मा.नगरसेवक सनी मुजावर यांच्या उपस्थितीत या रस्त्याची पाहणी केली व विविध सूचना केल्या.   

      या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देहू-आळंदी सह विविध ठिकाणाहून याच रस्त्याने दिंड्या,पालख्यासह लाखो भाविक पंढरपुरात प्रवेश करतात मग हा मार्ग कॉक्रीटीकरण करण्यापासून का वंचित ठेवायचा अशीच भूमिका गडकरी यांनीही घेतली असून त्यामुळेच या रस्त्याचा तातडीने डीपीआर तयार करून त्यास मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *