“एससीजी डिझाईन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड ही एक अभियांत्रिकी विश्लेषण व डिझाइनसाठी आवश्यक असलेले नवीनतम तंत्रज्ञान वापरून डिझाईन सोल्युशन्स किफायतशीर, ञास मुक्त अभियांत्रिकी उपाय प्रदान करते. अशा या “एससीजी डिझाईन सोल्युशन्स” कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विजय महादेव वाघमारे, सपना सुनिल लावंड, अंकिता शहाजी घाडगे, दिपाली धोंडिराम शिवणकर, संदिप वन्नाप्पा चौगुले, कोमल दत्तात्रय शिंदे, राजश्री यशवंत गरड, राम नवनाथ नागणे आणि सुदर्शन काळेल आदी ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना “एससीजी डिझाईन सोल्युशन्स” कंपनीकडून सहा आठवड्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर २.६४ लाख वार्षिक पगार मिळणार आहे.
“एससीजी डिझाईन सोल्युशन्स” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
