Uncategorized

दुट्टपी भूमिका राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते चालू देणार नाहीत 

                                         

 

पंढरपूर तालुक्यातील तूर्तास तरी अधिकृतरित्या भाजपात असलेले सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात होताना दिसून येत आहे.विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून कल्याणराव काळेंची ओळख असली तरी अनेकदा विठ्ठल परिवारातील दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात त्यांनी निवडणुकीत सक्रिय भूमिका पार पाडली असल्याचे दिसून येते.२००९ च्या विधानसभा निवणुकीत स्व.आमदार भारत भालके यांनी विजयसिह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली तेव्हा काळे हे मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते.तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा एकदिवसीय शिवसेना प्रवेश आणि पुन्हा घरवापसी करीत कॉग्रेसकडून उमेदवारी घेत माढा मतदार संघाची निवडणूक लढविली आणि पराभूत झाले. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काळेंनी भाजपात प्रवेश केला आणी तूर्तास तरी ते भाजपात आहेत.पण आता ते राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच २०१४ ते २०१९ या काळात पक्ष सत्तेत नसताना राष्ट्रवादी कॉग्रेसशी प्रामाणिक राहून काम केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र काळेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.                                         कल्याणराव काळेंनी अजून तरी अधिकृत भूमिका जाहीर न केल्यामुळे तूर्तास तरी ते भाजपात असल्याचे समजले जाते.त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या वावड्या उडत असताना ते कधी या प्रवेशाचा इन्कारही करत नसल्याचे दिसून येते.अशातच नुकतेच भाजपच्या वतीने वीज दरवाढ व वसुली विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.तसेच पंढरपुरातही आंदोलन झाले.या आंदोलनास काळेंची अनुपस्थिती होती.मात्र याच दिवशी कॉग्रेसच्या शहराध्यक्षाच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित होते.पुढे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ.प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यापासूनही ते लांब राहिले.काल मंगळवेढ्यात आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जनसंवाद यात्रेत त्यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून नाव होते अर्थात ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले नसले तरी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांकडून काळेंच्या बदलत्या भूमिकांची चर्चा होत असून पक्ष सत्तेत असताना आम्ही निष्ठेने काम केले आता कल्याणराव काळे हे दुट्टपी भूमिका घेत आहेत  अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांनीही व्यक्त केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *