गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डॉक्टरचे अपहरण; खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांच्या गुन्हे शाखेने डॉक्टरच्या अपहरणाच्या घटनेची उकल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी खंडणीसाठी अपहरण करायची. रेकी करून अपहरण केल्यानंतर खंडणी वसुली करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये राहणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरचे ६ फेब्रुवारी रोजी वांद्र्याच्या कार्टर रोडवरून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्याकडे ९ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. डॉक्टरने इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. त्यावेळी कमी पैसे स्वीकारण्याची तयारी या टोळीच्या सदस्यांनी दाखवली.

आरोपींनी ६ लाख ४० हजार रुपये घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरला सोडले.गुन्हेगारांच्या तावडीतून सुटल्यानंतर डॉक्टरने तात्काळ पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिसांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना आरोपींच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दहिसरमधून आरोपींना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *