ताज्याघडामोडी

 डॉ. शीतल पाटील व डॉ. संगीता पाटील यांचा सन्मान

 डॉ. शीतल पाटील व डॉ. संगीता पाटील यांचा आ. भारतनाना भालके यांनी केला सन्मान

 

 

कोरोनारुपी संकट ओढवल्यापासुन बहुसंख्य नागरिक हे प्रचंड दडपणाखाली वावरत आहेत. व त्यातच…. डॉक्टर्स, हॉस्पिटल व्यवस्थापन याबाबत सातत्याने नकारात्मक चर्चा कानावर पडत असते. किंतु, सरसकट सर्वच डॉक्टरांना बदनाम करणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या स्वार्थाने बरबटलेल्या काही व्यक्ती या असतातच. त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. कोरोनाशी लढताना समाजातील अनेक घटकांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. वास्तविक पाहता या लढ्यात सर्वात महत्वाची भुमिका कोणाची असेल तर ती डॉक्टरांचीच, हे आपल्या सर्वांना मान्यच करावे लागेल. आपल्या पंढरपूर शहरातीलदेखील अनेक डॉक्टर्स हे त्यांच्यापरीने सर्वोतपरी कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य हे प्रशंसनीय आहेच. तथापि या सर्व डॉक्टर्समध्ये सन्माननीय डॉ. श्री. शीतल पाटील व त्यांच्या सुवीद्य पत्नी डॉ. सौ. संगीताताई पाटील यांचे कार्य हे विशेषतत्वाने कौतुक करण्यासारखेच आहे. स्वतःचा वैयक्तिक खाजगी दवाखाना संभाळत असतानाच, गेल्या सहा महीन्यांपासुन सामाजिक बांधिलकी जपत अगदी नि:शुल्क सेवा देण्याचे काम हे डॉ. पाटील दाम्पत्य करत आहे. जेव्हापासून आपल्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांना Home isolate करण्यात येऊ लागले, तेव्हापासून हे दाम्पत्य अशा रुग्णांच्या घरोघरी जावून सेवाभावी वृत्तीने उपचार करीत आहेत. ईतर डॉक्टर आयसोलेट पेशंटवर उपचार करण्यासाठी हजारो रुपये फि आकारत असताना, आजमितीस डॉ. पाटील दाम्पत्य मात्र उदारमनाने तब्बल २६१ Home isolate पेशंटवर पुर्णपणे मोफत उपचार करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी रात्री 8.30 च्या सुमारास हे उभयंता नेहमीप्रमाणे एक शिक्षक जे कोरोनाबाधित आहेत त्यांना तपासण्याचा दिवस एकदिवसाआड असतानादेखील, आपल्या घराच्या वाटेवर सदर शिक्षकाचे घर लागतं म्हणून सहज चौकशी करण्याच्या उद्देशाने त्या शिक्षकाच्या घरी गेले. त्यांच्या घरात पाऊल ठेवताक्षणी, ते शिक्षक महोदय फोनवर बोलत असतानाच अचानक धाडकन जमिनीवर कोसळले. डॉ. शीतल पाटील यांना त्वरित लक्षात आलं, कि सरांना झटका आला असावा आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या शिक्षकाच्या हृदयावर जोरात दाब देऊन, प्रसंगी त्यांना जोरजोरात मार वगैरे देऊन आपले पूर्ण कौशल्य पणास लावले. व अखेर त्या शिक्षकाचे प्राण अक्षरशः यमाच्या दारातून परत आणण्यात यश मिळवले. हा सर्व प्रकार घडत असताना, डॉ. संगीता पाटील यांनीदेखील आपलं अर्धांगिनीचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलं. Actually, कोरोना हा असा संसर्गआजार आहे की जो बरा होऊ शकतो. परंतु, काही लोक अनावश्यक भितीपोटी जास्त विचार करतात व पॅनिक होवून त्यातून त्यांना हृदयविकाराचा, अर्धांगवायूचा झटका येण्याचा संभव वाढतो. त्या रात्री डॉ. शीतल पाटील व डॉ.संगीता पाटील हे घटनास्थळी योग्य वेळी उपस्थित झाल्यामुळे, त्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून एका व्यक्तीचे प्राण वाचवले. उगाच नव्हे डॉक्टरांना ईश्वर म्हणतात, याची प्रचितीही आली.
डॉ. पाटील दाम्पत्य व त्यांच्या टीमच्या कार्याला उजाळा मिळावा, ईतरांनीही यातुन प्रेरणा घ्यावी, या हेतूने
महाराष्ट्र वीरशैव सभा या संघटनेच्या वतीने त्यांचा आ. सन्माननीय भारतनाना भालके यांचे शुभहस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. आमदार साहेबांनी डॉ. पाटील दाम्पत्य व त्यांच्या टिमबरोबर आस्थेने चर्चा करत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. Covid warrior म्हणून कार्यरत असताना जे काही वैद्यकीय साहित्य हवे असेल, ते त्वरीत उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील दिली. याप्रसंगी संघटनेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे, वीरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष सुरज पावले, विठ्ठल सह. सा. का. चे संचालक दिनकर पाटील, रेखा चंद्रराव, संध्या राखी, तुकाराम खंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *