Uncategorized

भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मणराव धनवडे यांची निवड

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच सोलापूर जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत त्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यशस्वी ठरलेले लक्ष्मणराव धनवडे यांच्यावर आता भाजपाने अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आज सोलापूर जिल्यातील भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या असून यात लक्ष्मणराव धनवडे यांच्याही निवडीची घोषणा केली आहे.
     अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे नूतन जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव धनवडे यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात कट्टर परिचारक समर्थक म्हणून ओळख आहे.माजी आमदार स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारावर अढळ श्रद्धा ठेवत गेल्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांनी परिचारकांनी सोपविलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तर मा.आ.स्व.सुधाकरपंत परिचारक व आ.प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.ते स्वतः महादेव कोळी जमातीचे असल्यामुळे त्यांना अनुसूचित जाती जमातीच्या विविध प्रश्नाची जाण आहे.त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देत ते सोलापूर जिल्ह्यात भाजपाची विचारधारा आणखी मजबूत करतील असा विश्वास व्यक्त होताना दिसून येत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *