ताज्याघडामोडी

पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून आपल्या वयाची एकस्षठी साजरी

पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा सायकल प्रवास करून वयाची साठी उलटून देखील आपण २२३७ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण करु शकतो. हे दिगंबर भोसले यांनी दाखवून तरुण पिढीला आश्चर्य चकीत करुन टाकले.

   या सायकल प्रवासात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सचिन राऊत हा एकवीस वर्षांचा तरुण देखील या सायकल प्रवासात सामील होता एक तरुण साठीकडे झुकलेला तर एक तरुण तारुण्यात पदार्पण करीत असलेला असा दोन्ही पिढीतील तफावत असलेली ही जोडगोळी पंढरपूरच्या रुक्मिणी माता ते कलकत्त्याच्या काली माता हा सायकलवरील प्रवास त्यांनी पंचवीस दिवसांमध्ये २२३७ कि.मी.चा हा सायकलचा प्रवास पूर्ण केला आहे. 

  पंढरपूर येथील पंढरी सायकल मॅरेथाॅनचे मुख्य आयोजक व आम्ही पंढरपुरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी व पत्रकार राधेश बादले पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.

   आजरोजी दिगंबर भोसले हे एकसष्ट वर्ष पुर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने एकसष्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी नगराध्यक्ष नागेशजी भोसले यांच्या हस्ते सायकल पट्टू दिगंबर भोसले तसेच सचीन राऊत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिगंबर भोसलेंचे मोठे बंधू माजी सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख दत्ता भोसले व अवधूत भोसले आणि कुटूंबीय सदस्य मित्रमंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *