ताज्याघडामोडी

विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी अनुकूल हवामान नसल्याने पावसाने दडी मारली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे. या विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी (दि.16) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासाह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे.या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.तर पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे.त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘या’ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

मंगळवारी देखील राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.मंगळवारी पुण्यासह 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.आंध्र प्रदेशात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं दक्षिण मराठवाड्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

आज पुण्यात पावसाची शक्यता

काल पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.आजही मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याशिवाय पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर पुणे घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *